छत्रपती संभाजीनगर

पावसाचा खंड, खरीप संकटात पीक व्यवस्थापनासाठी कृषि विभागाकडून तातडीच्या मार्गदर्शक सूचना जारी; पिकांच्या संवेदनशील वाढीच्या अवस्थांमध्ये संरक्षित सिंचन द्यावे

CD
पावसाच्या सतत खंडामुळे असे करा पीक व्यवस्थापन लातूर विभागात मागील सुमारे २० दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे. सततच्या पावसाच्या खंडामुळे विशेषतः हलक्या जमिनीतील ओलावा वेगाने कमी झाला असून पिकांना पाण्याअभावी ताण सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर लातूर विभागातील सर्व तालुक्यांमधील खरीप पिकांची सद्यस्थिती, पावसाचे प्रमाण, जमिनीतील ओलावा आणि पीकनिहाय नुकसानाची पातळी विचारात घेऊन कृषी विभागाने तातडीच्या पीक व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांसाठी उपाययोजना व मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. कृषी विभागाने दिलेल्या सूचनांनुसार, शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची सद्यःस्थिती व जमिनीतील ओलाव्याचे नियमित निरीक्षण करून उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा आणि पिकांच्या संवेदनशील वाढीच्या अवस्थांमध्ये संरक्षित सिंचन द्यावे. तसेच कपाशी आणि तूर यांसारख्या पिकांमध्ये जलसंधारणासाठी आंतरमशागतीद्वारे सरी काढून पुढे पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जलसंधारण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी उपट तणांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, जेणेकरून तणमुक्त जमिनीतील ओलावा मुख्य पिकासाठी उपयोगी पडेल. यासोबतच पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार आंतरमशागत करून जमिनीला पडलेल्या भेगा बुजवाव्यात, ज्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यास मदत होईल. पिकांच्या स्थितीनुसार फवारणी पिकांवर पडणारा ताण कमी करण्यासाठी आणि त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विविध अन्नद्रव्ये व जैविक निविष्ठांच्या फवारणीचा सल्ला देण्यात आला आहे. पिकांच्या स्थितीनुसार पोटॅशियम नायट्रेट (१ ते २ टक्के) किंवा ००:५०:३४ (१ टक्का) या अन्नद्रव्यांची दर ८ ते १० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी, ज्यामुळे पिकांना पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता प्राप्त होते. या व्यतिरिक्त बायो एनपीके, बायोमिक्स आणि मायकोऱ्हायझा यांसारख्या जैविक निविष्ठांचा वापर केल्यास पिकांना जैविक व अजैविक ताण सहन करण्यास मदत होते. फळबागा, उसाबाबत खबरदारी फळबागा आणि ऊस पिकांमध्ये जमिनीतील ओलावा संरक्षित ठेवण्यासाठी सेंद्रिय आच्छादनाचा प्रभावी वापर करावा. तसेच पिकांवरील कीड व रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमित पाहणी करून एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करावा. तसेच, शेततळ्यांमधील साठवलेल्या पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी विशेष तांत्रिक उपाययोजना सुचवण्यात आली असून, त्यासाठी सिटाईल अल्कोहोल २० मिली प्रति चौरस मीटर या प्रमाणात दर १० दिवसांनी पाण्याच्या पृष्ठभागावर पसरवावे, असे आवाहन लातूर विभागीय कृषी सहसंचालक महेश तीर्थकर यांनी केले. ---- शेतकऱ्यांनी याकडे द्यावे लक्ष पिकांची सद्यःस्थिती व जमिनीतील ओलाव्याचे नियमित निरीक्षण करण्यात यावे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून संवेदनशील अवस्थेतील पिकांना संरक्षित सिंचन द्यावे. कपाशी, तूर पिकांत जलसंधारण सरी काढून पुढे पडणाऱ्या पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जलसंधारण करावे. उपट तणांना काढून तण नियंत्रण करावे जेणेकरून जमिनीतील ओलावा टिकून राहून पिकासाठी उपयोगी पडेल. पिकांच्या अवस्थेनुसार आंतरमशागतीच्या माध्यमातून जमिनीतील भेगा बुजवून ओलावा टिकवून ठेवावा. पिकांवरील कीड व रोगांचे नियमित निरीक्षण करून एकात्मिक व्यवस्थापन करावे. फळबाग आणि उसामध्ये आच्छादनाचा वापर करून जमिनीतील ओलावा संरक्षित करावा. -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापटांना मारहाण, पंडितना अटक! मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पुण्यासारख्या ठिकाणी...

Elina Svitolina Interview : युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाचे पतीसोबत ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न! न्यूयॉर्कमधील अनुभवाबद्दल मारल्या गप्पा

Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांना २४ तास पोलिस सुरक्षा; पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी स्पष्ट शब्दांत खडसावलं

बॅडमिंटन खेळताना क्षुल्लक वाद, ११ वर्षांच्या मुलानं खिशातून चाकू काढला; ९ वर्षीय मुलाचा मृत्यू, घटना CCTVत कैद

Janmashtami Kids Dress Up: मुलांना राधा अन् कृष्णाचा लुक द्यायचायं? घरच्या घरी चिमुकल्यांना 'असे' द्या गोंडस रूप!

SCROLL FOR NEXT