

गणेशोत्सवासह पारंपरिक सण-उत्सव, कार्यक्रमात डीजे, ढोल वादन या विरोधात भूमिका घेतलेल्या विद्यानंद बापट यांच्यावर आज पुण्यात हल्ला करण्यात आला. संतोष चव्हाण नावाच्या तरुणानं हा गणेशोत्सवाला विरोध करतो म्हणत विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला केला. पुण्यात टिळक रोडवरील कशाळे चौकात ही घटना घडली. या प्रकरणी संतोष चव्हाणविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आलीय. तर दुसरीकडे पालकमंत्री चंद्रकांत दादांवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या संतोष पंडित यांना अटक झालीय. या दोन्हीबाबत विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, असे वाद योग्य वाटत नाहीत असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.