Aurangbad sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangbad : सुधारित बेण्याची लागवड करा

जयप्रकाश दांडेगावकर : १५ एप्रिलपर्यंत पूर्ण ऊस गाळप करणार

सकाळ वृत्तसेवा

वसमत : ‘‘परंपरागत बेणे लागवड करण्याऐवजी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सुधारित बेण्याची लागवड केल्यास उत्पन्नात वाढ होईल. यावर्षी उसाचे क्षेत्र जास्त असले तरी योग्य वाढ न झाल्यामुळे उसाचे उतारे कमी येणार असून, कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस १५ एप्रिलपर्यंत पूर्णा कारखान्यामार्फत गाळप करण्यात येणार आहे’’, अशी ग्वाही पूर्णा कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली.

पूर्णा सहकारी साखर कारखान्याचा ४२ वा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम मंगळवारी (ता. एक) झाला. अध्यक्षस्थानावरून श्री. दांडेगावकर होते. आमदार राजू नवघरे आणि वर्षा नवघरे, शहाजीराव देसाई आणि सुमित्रा देसाई, दत्तराव चव्हाण आणि सुलोचना चव्हाण यांच्या हस्ते अग्निप्रदीपन झाले. यावेळी दांडेगावकर पुढे म्हणाले, ‘‘गेल्या वर्षीपासून शेतकरी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अंतर्गत पिकामध्ये उसाची लागवड करीत आहे.

या उसामध्ये खोडव्या फुटण्याचे प्रमाण कमी असतात. जमिनीची मशागत न केल्यामुळे आणि चिखलामध्ये नुसते उसाच्या कांड्या लावल्यामुळे उसाचा उतारा दहा ते पंधरा टन कमी येणार आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्र जास्त असले तरी १५ एप्रिलपर्यंत संपूर्ण कार्यक्षेत्रातील ऊस गाळपास येईल. ऊस उत्पादकांनीसुद्धा घाबरून न जाता ऊसतोड कामगारांना जास्तीचे पैसे देऊ नये’’, असे आवाहन त्यांनी केले.

सोबतच कार्यक्षेत्रातील परंपरागत उसाचे बेणे खराब झाले असून, त्याचा परिणाम ऊस उताऱ्यावर होत असून उतारा कमी येत आहे. या दोन वर्षात सभासदांनी कारखान्याच्या शेती विभागाच्या संपर्कात राहून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील बेणे घेऊन त्याची लागवड करण्याचे आवाहन दांडेगावकर यांनी केले.

यावेळी आमदार नवघरे यांनी मागील ४२ वर्षांपासून दांडेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतिपथावर जात असून, याचा लाभ ऊस उत्पादकांना होत असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार पंडितराव देशमुख काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Forecast : 500 मिमीवरून पाऊस थेट शून्यावर! पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावरील पावसाला अचानक का लागला ब्रेक? 'आयएमडी'ने दिले स्पष्टीकरण

Pune Water Supply Update : पुणेकरांना दिलासा ! पाणी कपातीचे संकट तूर्तास टळले; खडकवासला धरणात समाधानकारक साठा

Latest Marathi News Update : पावसाअभावी कपाशी संकटात; कोरडवाहू शेतकऱ्यांची चिंता वाढली

भाईजान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? सलमान खानने विकली वांद्र्यातील प्रॉपर्टी, कोट्यवधींची डील

Pune Rainfall : पुण्यावर वरुणराजाची कृपेची सावली! मुळशी, पवना, खडकवासल्यात मागील वर्षापेक्षा अधिक पाऊस; धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही समाधानकारक पर्जन्यमान, ताजी आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT