छत्रपती संभाजीनगर

ग्राहकांना जागरूक करणार : डॉ. लाड

CD
ग्राहकांना जागरूक करणार : डॉ. लाड नांदेड, ता. ३१ : ग्राहकांच्या आर्थिक शोषणाविरोधात व्यापक जनजागृती करण्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या वतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी माहितीपूर्ण ‘रील्स’ तयार करून व्हॉट्सॲप आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्या नागरिकांपर्यंत पोचविण्यात येतील, असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्याध्यक्ष डॉ. विजय लाड यांनी केले. चिखलवाडी येथील सीताराम मंदिरात आयोजित ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या नांदेड शाखेच्या जिल्हा बैठकीत ते बोलत होते. यावेळी डॉ. सायन्ना मठमवार यांची नांदेड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा डॉ. लाड यांनी केली. प्रारंभी प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात डॉ. लाड यांनी वडगाव मावळ येथे ८ आणि ९ ऑगस्ट रोजी झालेल्या संघटनेच्या वार्षिक अधिवेशनाची माहिती दिली. या अधिवेशनात मराठवाडा विभागातून नांदेड जिल्ह्याला दोन मानाचे पुरस्कार मिळाले. डॉ. सुरेश खुरसाळे यांना उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार, तर भागीरथी बच्चेवार यांना विद्यार्थी ग्राहक जागरण पुरस्कार प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्याबद्दल भागीरथी बच्चेवार तसेच ॲड. विना शेवडीकर यांची नांदेड जिल्हा परमनंट लोकअदालत समितीवर निवड झाल्याबद्दल आणि ॲड. दीपाली डोणगावकर यांची नांदेड जिल्हा अभिवक्ता संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील ग्राहक संरक्षणाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांची माहिती राज्य समन्वयकांकडे पाठवावी, जेणेकरून राज्यपातळीवरून प्रशासनाकडे त्याबाबत पाठपुरावा करता येईल, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. विभाग संघटक बालाजी लांडगे यांनी तालुका स्तरावर संपर्क वाढवून शाळा आणि महाविद्यालयांत ‘विद्यार्थी ग्राहक जागरण’ या विषयावर व्याख्याने आयोजित करण्याचे आवाहन केले. जिल्हा संघटक ॲड. आनंद कृष्णापूरकर आणि नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉ. सायन्ना मठमवार यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस रंगनाथ उंबरकर, अरविंद बीडवई, डॉ. दीपक कासराळीकर, रमाकांत घोणसीकर, ॲड. सुरेंद्रसिंग लोणीवाले, जयवंत सोमवाड, प्रा. संध्या खरवडकर, पुष्पा संगारेड्डीकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली-महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावं वगळली; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? कसं चेक करायचं?

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Marathi News Live Updates : भारतातील बोगदा बचाव पथकाची नेपाळी लष्करासोबत भागीदारी

‘निपुण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल! खोल समुद्रातील मोहिमा करणार, पाणबुडी बचाव क्षमतेला बळ; पाहा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT