छत्रपती संभाजीनगर

आरोग्य विभागाचा डाटा वापरून लाभार्थी महिलेला प्रसुतीच्या मदतीचे पैसे देण्याच्या बहाण्याने लाखाला घातला गंडा..

CD
आरोग्य विभागाचा डेटा भामट्यांच्या हाती? ----- प्रसूती अनुदानाचे आमिष दाखवून साडेचार लाखांचा गंडा; लाभार्थींची नावे, छायाचित्रे वापरली ---- कुंभार पिंपळगाव, ता. १७ (बातमीदार) : आरोग्य विभागातील माहितीचा वापर करून शासनाकडून मिळणारी प्रसूतीची मदत देण्याच्या बहाण्याने सायबर भामट्यांनी लाभार्थींचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पाडोळी खुर्द (ता. घनसावंगी) येथील दोन लाभार्थींची ऑनलाइन फसवणूक करून त्यांच्या बँक खात्यांतून रक्कम लंपास केली. या प्रकारामुळे आरोग्य विभागातील लाभार्थींची नावे आणि छायाचित्रे सायबर भामट्यांपर्यंत पोचली कशी, असा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सायबर भामट्यांनी पाडोळी खुर्द येथील विष्णू दिगंबर नाईक यांच्याशी आशा स्वयंसेविकेच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. प्रसूती झालेल्या महिलांच्या खात्यांवर शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत जमा होण्यास सुरवात झाली आहे. मात्र, तुम्ही ऑनलाइन माहिती भरली नसल्याने तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी बतावणी त्यांनी केली. यावेळी आशा स्वयंसेविका नंदा धुमाळ यांनाही कॉन्फरन्स कॉलद्वारे सहभागी करून घेण्यात आले. गावातील प्रसूती झालेल्या महिलांची नावे आणि छायाचित्रे दाखवून संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची नावे सांगण्यात आली. त्यामुळे लाभार्थींचा विश्वास संपादन करण्यात भामट्यांना यश आले. याच विश्वासाचा गैरफायदा घेत भामट्यांनी फोन-पेच्या माध्यमातून विष्णू नाईक यांच्या बँक खात्यातून ट्रॅक्टरचा हप्ता भरण्यासाठी जमा केलेली ९९ हजार रुपयांची रक्कम काढून घेतली, तर दुसरे लाभार्थी विकास अंकुश नाईक यांच्या खात्यातून साडेतीन लाख रुपये ऑनलाइन पद्धतीने लंपास केले. अशा प्रकारे दोन्ही लाभार्थींची आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी सायबर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ---- नावे आणि छायाचित्रे कशी मिळाली विशेष म्हणजे, गावातील प्रसूती झालेल्या महिलांची नावे आणि छायाचित्रे सायबर भामट्यांकडे उपलब्ध कशी झाली, याबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे. पाडोळी खुर्द हे गाव खडका उपकेंद्रांतर्गत पिंपरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडलेले आहे. तसेच हा प्रकार तीर्थपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. या घटनेबाबत वैद्यकीय अधिकारी आणि तीर्थपुरीच्या सहायक पोलिस निरीक्षक वैशाली पवार यांना माहिती नसल्याचे समोर आले आहे.

IPL मधील निवृत्तीनंतर शेअर बाजारात एन्ट्री; धोनीची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा लवकरच येणार IPO

Cabinet Decision: शिक्षण क्षेत्रापासून न्यायालयापर्यंत, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ धडाकेबाज निर्णय

Gurnoor Brar: भारताच्या गुरनूर ब्रारला ICC कडून मोठी शिक्षा! वनडेतील भांडण पडलं महागात

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्रीनं दिली गुडन्यूज! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Latest Marathi News Live Update : गिरीश महाजन संकटमोचक, पण लय लफडेबाज; गुलाबराव पाटलांची फटकेबाजी

SCROLL FOR NEXT