छत्रपती संभाजीनगर

ज्ञानप्रकाश प्रकल्पात सायबर सुरक्षा कार्यशाळा

CD
ज्ञानप्रकाश प्रकल्पात सायबर सुरक्षा कार्यशाळा लातूर, ता. १६ : ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पात क्विक हील फाउंडेशनच्या वतीने सायबर सुरक्षा विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या प्रकल्पातील प्रार्थना सभा ‘विचारसभा’ म्हणून ओळखली जाते. या सभेत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, पर्यावरण व आरोग्यविषयक बाबींवर संवादात्मक चर्चा केली जाते. सध्याचे युग माहिती व तंत्रज्ञानाचे असून, त्यात सातत्याने बदल होत आहेत. समाजमाध्यमांचा वापर करताना कळत-नकळतपणे अनेकजण फसवणुकीला बळी पडतात. त्यामुळे आर्थिक तसेच मानसिक नुकसान होण्याच्या घटना वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर सायबर सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. राजर्षी शाहू महाविद्यालयातील साहिल जाधव, परमेश्वर पांढरे, नेहल बुलाणी व नम्रता तावर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अनोळखी व्यक्तींशी समाजमाध्यमांवर मैत्री करताना किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवताना सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे नेहल बुलाणी यांनी सांगितले. समाजमाध्यमांवरील अशा संपर्कातून अनेकदा फसवणूक होऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली. साहिल जाधव यांनी खेळकर पद्धतीने गेमिंग, पासवर्ड आणि ऑनलाइन सुरक्षिततेतील बारकावे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यशाळेच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेची शपथ घेतली. यावेळी मुख्याध्यापक तथा संचालक सविता नरहरे उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT