छत्रपती संभाजीनगर

टपालाच्या तक्रारींसाठी आता दरमहा ‘डाक अदालत’

CD
((अँकर)) ............ चौदा दिवसांत होणार समस्यांचे निराकरण टपालाच्या तक्रारींसाठी आता दरमहा ‘डाक अदालत’ सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. ३ ः टपाल सेवा वापरताना येणाऱ्या अडचणी, विलंब आणि ग्राहकांच्या प्रलंबित गाऱ्हाण्यांची वेळेत व प्रभावी सोडवणूक करण्यासाठी भारतीय डाक विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर २०२६ पासून दरमहा ‘डाक अदालत’ आयोजित करण्यात येणार असून, प्राप्त तक्रारींचे अवघ्या १४ दिवसांच्या आत निराकरण केले जाणार आहे. ही डाक अदालत विभागीय, प्रादेशिक आणि मंडळ स्तरावर अनुक्रमे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात होईल. धाराशिव विभागाची विभागीय डाक अदालत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी ११ ते १२ या वेळेत येथील भानूनगर येथील अधीक्षक कार्यालयात पार पडेल. सुटी असल्यास पुढील कामकाजाच्या दिवशी ही अदालत होईल. ....... ई-मेल आणि व्हीसीची सोय ग्राहकांना आपली तक्रार प्रत्यक्ष, टपालाद्वारे किंवा sposmd.mah@gmail.com या ई-मेलवर पाठवता येईल. प्रत्यक्ष येणे शक्य नसलेल्यांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय देण्यात आली असून, धाराशिव मुख्य डाकघरात यासाठी जनसंपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. ......... ((कोट)) टपाल सेवा थेट नागरिकांच्या दैनंदिन व्यवहाराशी जोडलेली असल्याने तक्रारींचे वेळेत निवारण होणे गरजेचे आहे. दरमहा होणाऱ्या या अदालतीचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा. - आर.एस. बोटलावार, डाक अधीक्षक, धाराशिव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापटांना मारहाण, पंडितना अटक! मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पुण्यासारख्या ठिकाणी...

Vidyanand Bapat Santosh Chavan : संतोष चव्हाणने विद्यानंद बापट यांना का मारलं ? खरं कारण सांगितलं; मंडळाचा माजी अध्यक्ष काय म्हणाला?

Krishna Janmashtami 2026 Do's & Don'ts: गोकुळाष्टमीचा उपवास करताना 'या' गोष्टी टाळाच; श्रीकृष्णांची राहील सदैव कृपा!

अभिनंदन वर्धमान यांची हवाई दलातून स्वेच्छानिवृत्ती, गोव्यात खासगी कंपनीत करतायत काम

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी जरांगेंच्या 15 मागण्या काय? सरकारची भूमिका काय? | Maratha Reservation

SCROLL FOR NEXT