Date of NMMS Scholarship Examination Announced exam June 19 sakal
छत्रपती संभाजीनगर

NMMS शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर

१९ जूनला होणार परीक्षा; ऑगस्टमध्ये निकाल

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता आठवीसाठी घेण्यात येत असलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा १९ जून रोजी घेण्यात येणार आहे. याबाबत परीक्षा परीषदेने पत्र जारी केले आहे.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा दरवर्षी फेब्रुवारीत घेतली जाते. मात्र, करोनामुळे वेळापत्रक कोलमडले होते. चालू शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेण्याची घोषणा करण्यात आली होती. डिसेंबरमध्ये विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर जानेवारीमध्ये पुन्हा मुदत वाढवून देण्यात आली होती. परीक्षा होणार की नाही, होणार असल्यास ती कधी होणार याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यात संभ्रमावस्था निर्माण झाली होती.

मात्र, अखेर परीक्षा परीषदेने १९ जूनला महाराष्ट्रातील विविध केंद्रावर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किंवा शिक्षण निरिक्षक बृहन्मुबई यांचे मार्फत राज्यभर परीक्षा घेण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. यासाठी राज्यभरातून सुमारे सात लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केलेली आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी नियमित आवेदनपत्रे भरण्यासाठी ६ ते २६ एप्रिलपर्यत मुदत आहे. विलंब आवेदनपत्रासाठी २७ एप्रिल ते एक मेपर्यतं अवधी असेल, तर अतिविलंबासह आवेदनपत्र भरण्यासाठी २ ते ६ मेदरम्यान मुदत दिली आहे.

दृष्टीक्षेपात...

  • विद्यार्थ्यांना दोन्ही विषयात मिळून पात्रतेसाठी ४० टक्के तर एससी, एसटी व दिव्यांग विद्यार्थ्यांना पात्रतेसाठी ३२ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.

  • अखिल भारतीय पातळीवर शिष्यवृत्तीची संख्या एक लाख आहे. महाराष्ट्रासाठी ११ हजार ६८२ इतका कोटा निश्चित केला आहे.

  • परीक्षेचा निकाल ऑगस्टमध्ये जाहीर केला जाणार असून पात्र विद्यार्थ्यांना नववी ते बारावीपर्यंत दरमहा एक हजार (वार्षिक बारा हजार) रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल.

वेळापत्रक

१९ जून ः १०.३० ते १२ - बौद्धिक क्षमता चाचणी

दुपारी १.३० ते ३ - शालेय क्षमता चाचणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT