छत्रपती संभाजीनगर

​मालुंजा येथील श्री दत्त मंदिर परिसरातील भाविकांसाठी ठरणार आध्यात्मिक ऊर्जास्थान :महंत रामगिरीजी महाराज

CD
अँकर ABD26J82227 मालुंजा ः श्री दत्त मंदिराचे भूमिपूजन करताना रामगिरी महाराज, योगेंद्रगिरी महाराज, आमदार रमेश बोरनारे, उपसभापती राजेश हिवाळे. मालुंजा येथे दत्त मंदिर जीर्णोद्धाराचे भूमिपूजन - भाविकांच्या सहकार्यातून भव्य मंदिर उभे राहील : महंत रामगिरी महाराज गंगापूर, ता. २८ (बातमीदार) : तालुक्यातील मालुंजा येथील शिवना नदीकाठी असलेल्या पुरातन श्री दत्त मंदिरासह इतर मंदिरांच्या जीर्णोद्धाराचा भूमिपूजन सोहळा सोमवारी (ता. २६) गोदाधाम सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. मालुंजा येथील या दत्त मंदिर आश्रमाचा इतिहास अत्यंत पुरातन आहे. ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांनी येथे अनेक वर्षे दत्त जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा चालवली. त्यांच्यानंतर या आश्रमाची धुरा ब्रह्मलीन लक्ष्मणगिरी महाराज यांनी समर्थपणे सांभाळली. दरम्यान, कायगाव-देवगाव रस्ता रुंदीकरणात शिवना नदीवरील पुलाजवळील ही पुरातन मंदिरे बाधित झाल्याने त्यांच्या पुनर्बांधणीची आवश्यकता निर्माण झाली होती. सध्या महंत रामगिरी महाराज यांनी या आश्रमाची जबाबदारी योगेंद्रगिरी महाराज यांच्याकडे सोपवली असून, पंचक्रोशीतील २५ ते ३० गावांचे हे प्रमुख आध्यात्मिक श्रद्धास्थान मानले जाते. यावेळी भाविकांना मार्गदर्शन करताना महंत रामगिरी महाराज म्हणाले की, ‘दत्तगुरूंनी आपल्या जीवनात २४ गुरू केले. त्याचप्रमाणे संसारी माणसांनी समाजातील चांगले गुण आत्मसात करावेत, वाईटाचा त्याग करावा आणि व्यसनांपासून दूर राहावे. आध्यात्मिक अधिष्ठान माणसाचे जीवन घडवते.’ चौकट यांची होती उपस्थिती सोहळ्यास आमदार रमेश बोरनारे, पंचायत समितीचे उपसभापती राजेश्वर हिवाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अनिल चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, लक्ष्मण भुसारे, बद्रीनाथ चव्हाण, कंत्राटदार डावखर, वास्तुविशारद (आर्किटेक्ट) गणेश काळे, अभियंता कृष्णा भराडे, सरपंच जगदीश साळुंके, शेषराव साळुंके, दत्त आश्रमाचे योगेंद्रगिरी महाराज, महंत अर्जुनगिरी महाराज, विक्रम महाराज, रामभाऊ महाराज, साई महाराज, दौलत महाराज मनाळ, दत्तू खपके, प्रदीप साळुंके, सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोट येथे साकारणारे भव्य दत्त मंदिर हे परिसरातील भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जास्थान ठरेल. प्रभू रामचंद्रांनी ज्याप्रमाणे वानरसेनेच्या मदतीने सेतू उभारला. त्याचप्रमाणे भाविकांच्या सहकार्यातून ३,५०० चौरस फुटांचे हे भव्य मंदिर लवकरच पूर्णत्वास येईल. - महंत रामगिरी महाराज, गोदाधाम सराला बेट --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Auction: सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील 'किरण' DCच्या ताफ्यात; मुंबई इंडियन्सकडून जोरदार प्रयत्न, पण.. कोण आहे Kiran Navgire?

Israel Election: इस्रायलच्या निवडणूक निकालात मोठा ट्विस्ट; 'बीबी' येणार की जाणार?

Marathi News Live Updates : नंदुरबार पंचायत समितीवर शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन; अपमानास्पद वागणूक आणि प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले!

Palghar News : पालघरमध्ये प्रकल्पविरोधी संघर्ष पेटणार! ५२ संघटनांचा प्रशासकीय बैठकीवर बहिष्कार, ३० ऑक्टोबरला जनआक्रोश सभा

Satana News : वृक्षतोड रोखा, अन्यथा जनआंदोलन; बागलाणमध्ये राष्ट्रवादीसह पर्यावरणप्रेमींचा एल्गार! माजी आमदार संजय चव्हाण यांचा इशारा

SCROLL FOR NEXT