Daulatabad Fort sakal
छत्रपती संभाजीनगर

देवगिरी किल्ल्यावरील अप्रकाशित लढाई

पाचशे मराठा सैनिकांची निजामाच्या दहा हजार सैन्याशी शर्थीची झुंज

सकाळ वृत्तसेवा

किल्ले देवगिरी येथे ३ जुलै १७६३ ते १७ जुलै १७६३ या पंधरा दिवसांच्या कालावधीत पाचशे मराठे विरुद्ध दहा हजार निजामाचे सैन्य यांच्यात लढाई झाली होती. आतापर्यंत या लढाईचा कुठेही उल्लेख आढळलेला नाही. मात्र, पुण्यातील इतिहास संशोधक व मोडी लिपी तज्ज्ञ राज मेमाणे यांना संशोधनातून या ऐतिहासिक लढाईची माहिती मिळाली आहे.

श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांची दक्षिणेकडील मोहीम सुरू असताना, निजामाने सैन्याचे तीन भाग करून मराठी मुलखावर हल्ले केले. यात विशेषतः पुण्यावर हल्ला करून केलेली जाळपोळ आणि लुट परिचित आहे. परंतु, याच सुमारास किल्ले देवगिरीवरही त्याने आपला सरदार राजाराम बाबूराव याला दहा हजार सैन्यानिशी पाठविले होते. त्यावेळी किल्ल्याची जबाबदारी उद्धव वीरेश्‍वर चितळे या सरदाराकडे होती.

किल्ल्यावरील मराठा सरदार आणि त्यांच्या तुकडीतील सुमारे पाचशे सैनिकांनी जवळपास पंधरा दिवस निजामाच्या सैन्याशी शर्थीची झुंज दिली. या लढाईत निजामाच्या सैन्याला माघार घ्यावी लागली. या सर्व लढाईचा तपशील पुणे पुरालेखागारातील पेशवे दप्तरात असलेल्या मोडी कागदपत्रांतून सापडला आहे. मराठ्यांनी कोण-कोणत्या दिवशी कशा पद्धतीने लढाई केली, त्यासाठी कोण-कोणती शास्त्रे वापरली, दारूगोळा किती वापरला, बंदुकीच्या गोळ्या व तोफांचे गोळे किती वापरले, याचे इत्थंभूत वर्णन मोडी कागदपत्रांतून पाहायला मिळते.

युद्धाची वैशिष्ट्ये...

  • अग्निबाणांचा वापर : लढाईत अग्निबाणांचा वापर झालेला दिसतो. अग्निबाण कशा प्रकारे व कोणकोणते रासायनिक पदार्थ वापरून बनविले, याची विस्तृत माहिती कागदपत्रांतून मिळते.

  • गनिमी कावा : या लढाईत गनिमीकाव्याचा वापरही मराठ्यांनी केला. रात्रीच्या अंधारात त्यांनी निजामाच्या सैन्यावर अग्निबाण टाकल्याने सैन्यात पळापळ झाली.

  • प्रतिकूल परिस्थिती अनुकूल बनविली : लढाई सुरू असताना मराठा सैन्याच्या काही तोफांचे गाडे मोडले. ते दुरुस्त करण्यासाठी लोखंडाची गरज होती. परंतु, किल्ल्याला वेढा असल्यामुळे बाहेरून लोखंड मागविता येणे शक्य नव्हते म्हणून कोठीतील खराब झालेल्या वस्तू... जसे की खिळे, कुलूप, खुंट्या, साखळदंड इत्यादी सुमारे ७० ते ८० प्रकारच्या खराब वस्तूंपासून किल्ल्यातच भट्टी लावून लोखंडी वस्तू तयार करून तोफांचे गाडे दुरुस्त केले.

पंधरा दिवसांच्या लढाईत अत्यंत कमी संख्याबळ असूनही मराठ्यांनी दोन-तीन वेळा किल्ल्याबाहेर जाऊन लढाई केली. यामध्ये मराठ्यांकडील केवळ एकच सैनिक ठार झाला.

लढाईत जे शूर मराठा सरदार आणि वीर लढले, त्यात उद्धव वीरेश्‍वर चितळे, गोविंद कान्हो, बाजीराव रघुनाथ, येसाजी कदम, मल्हार लक्ष्मण, धनसिंग, हरिसिंग, कानोजी संकपाळ, जिवाजी घाग, रायाजी जिवाजी, लक्ष्मण कदम, भिरवडेकर, गोपालजी फाटक, गणोजी तोरसकर, गणोजी थोरवे, भिकाजी जाधव, मानसिंग जेंजालदाज, भवानी खानदेसी, रामजी साटम, दादो महादेव, तेजू खा, दादो महादेव, मानसिंग द्यालदास, तुलाजी शिंदे, फटसावंत भोसले, रायाजी पवार, जनाजी जासूद, नरसीभान यांचा प्रामुख्याने समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT