छत्रपती संभाजीनगर

दयानंद महाविद्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद

CD
LTR26B14918 लातूर ः विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदके पटकावणारे दयानंद कला महाविद्यालयाचे खेळाडू. यावेळी प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, डॉ. नितेश स्वामी आदी. ---- दयानंद महाविद्यालयाला सर्वसाधारण विजेतेपद ---- विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पटकावली सात सुवर्णपदके ---- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. २२ ः स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय (बाभळगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या ‘अ’ विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत दयानंद कला महाविद्यालयाच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याच्या जोरावर दमदार यश संपादन केले आहे. या स्पर्धेत आपले निर्विवाद वर्चस्व गाजवत आठ वजनगटांपैकी ७ सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले व सर्वसाधारण विजेतेपदही पटकावले. स्पर्धेत ६० किलो वजनगटात भालेराव शिल्पकार, ७० किलो वजनगटात सार्थक शिंदे, ७५ किलो वजनगटात श्रीहरी शेंद्रे, ८५ किलो वजनगटात चैतन्य वाघमारे, ९५ किलो वजनगटात श्रीनिवास शेंद्रे, ११० किलो वजनगटात समर्थ उन्हाळे आणि ११० अधिक किलो वजन गटात कृष्णाकांत सुरवसे यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली. खेळाडूंच्या या चमकदार कामगिरीमुळे दयानंद कला महाविद्यालयाने क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा आपला दबदबा सिद्ध केला. खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा विभागप्रमुख प्रा.डॉ. नितेश स्वामी यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी, उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे, पर्यवेक्षक डॉ. प्रशांत दीक्षित, कार्यालयीन अधीक्षक संजय व्यास यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

Shirur News : महागणपतीच्या चार बहिणींच्या गावांना देवस्थान ट्रस्टमध्ये प्रतिनिधीत्व देण्याची मागणी

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT