छत्रपती संभाजीनगर

झोपेचे विकार ओळखून वेळीच उपचार गरजेचे

CD
ABD26J78674 (((फोटो ओळ)))) छत्रपती संभाजीनगर : ‘डिकोडिंग स्लीप’ या कार्यशाळेचे उद्‍घाटन करताना डॉ. शिवाजी सुक्रे. यावेळी डॉ. नंदा सोमवंशी, डॉ. काशीनाथ गर्कळ, डॉ. श्रीकांत पापीनवार, डॉ. विनोद मुदंडा, डॉ. सुरेश हरबडे व डॉ. मनीष मालानी. --- झोपेचे विकार ओळखून वेळीच उपचार गरजेचे ---- ‘डिकोडिंग स्लीप’वर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यशाळा ---- छत्रपती संभाजीनगर, ता. ५ : ‘निरोगी जीवनशैलीसाठी पुरेशी आणि गुणवत्तापूर्ण झोप अत्यंत महत्त्वाची आहे. झोपेचे विकार वेळीच ओळखून त्यांचे योग्य निदान व उपचार करणे आवश्यक आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांसह डॉक्टरांनी झोपेशी संबंधित आधुनिक संशोधन आणि उपचारपद्धतींची माहिती आत्मसात करावी,’ असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) शरीरक्रियाशास्त्र विभागातर्फे ‘डिकोडिंग स्लीप : द सायन्स ऑफ रेस्ट, रिपेअर ॲण्ड रेसिलिएन्स’ या विषयावर शुक्रवारी (ता. चार) ‘सातत्यपूर्ण वैद्यकीय शिक्षण’ (सीएमई) हा परिसंवाद झाला. त्याच्या उद्‍घाटनप्रसंगी डॉ. सुक्रे बोलत होते. यावेळी तज्ज्ञांनी झोपेचे शरीरविज्ञान, झोपेची आवश्यकता, ‘सर्केडियन रिदम’ (जैविक घड्याळ), झोप-जागृती चक्र तसेच झोपेशी संबंधित विविध विकारांवर सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये डॉ. अंजली शेटे, डॉ. तृप्ती बोरुळकर, डॉ. श्रीकांत पापीनवार, डॉ. अतुल पोरे, डॉ. रितेश भाग्यवंत, डॉ. प्रदीप देशमुख आणि डॉ. मंगलमूर्ती चौधरी यांनी विविध विषयांवर सादरीकरण केले. उपअधिष्ठाता डॉ. विनोद मुदंडा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे निरीक्षक डॉ. मनीष मालानी यांच्यासह डॉक्टर, प्राध्यापक, पदव्युत्तर विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन विभागाच्या ऑर्गनायझिंग सेक्रेटरी डॉ. नंदा सोमवंशी आणि डॉ. काशीनाथ गर्कळ यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. सुरवसे, डॉ. डांगे, डॉ. अश्फाक, डॉ. मुनीब, डॉ. रूपा यांच्यासह विभागातील अध्यापक व पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन डॉ. स्मिता बुटे यांनी केले, तर डॉ. प्रतिभा कलवले यांनी उपस्थितांचे आभार मानले. --- प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘पॉलिसॉम्नोग्राफी’, विविध ‘पीएपी’ मशिन्स आणि इंटरफेसेस यांवर प्रात्यक्षिकांसह कार्यशाळा घेण्यात आली. डॉ. श्रीकांत पापीनवार व त्यांच्या टीमने उपस्थितांना मार्गदर्शन केले. या ‘सीएमई’मध्ये सुमारे १३० डॉक्टरांनी सहभाग नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dahi Handi Accident Mumbai : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला

ऑनलाइन Grocery खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, काय बदलणार?

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांना जन्माष्टमीची भेट! महागाई भत्त्यात ६० टक्के वाढ, सरकार मोठा निर्णय घेणार

Marathi News Live Updates: पंतप्रधानांचा फोटो काढल्याप्रकरणी मनसेचे आशिष साबळे प्रशांत कनोजिया, विक्रांत कनोजियांना जामीन मंजूर

झीरम घाटी नक्षलवादी हल्ला प्रकरणात NIA कोर्टाने १० आरोपींना ठरवलं दोषी; छत्तीसगड काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांचं हत्याकांड प्रकरण

SCROLL FOR NEXT