छत्रपती संभाजीनगर

ब्राह्मण समाजाचे दीपक रणनवरे यांचे उपोषण स्थगित

CD
फोटो जालना ः दीपक रणनवरे यांचे उपोषण सोडवताना भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी. (छायाचित्र ः किरण खानापुरे) ---- ब्राह्मण समाजाच्या मागण्यांवर बैठक होणार -- जालन्यात दीपक रणनवरे यांचे उपोषण सातव्या दिवशी स्थगित --- सकाळ वृत्तसेवा जालना, ता. ४ ः ब्राह्मण समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी दीपक रणनवरे यांचे येथे सहा दिवसांपासून उपोषण सुरू होते. मागण्यांवर मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत चर्चेचे आश्वासन मिळाल्याने शुक्रवारी (ता.चार) त्यांनी उपोषण तूर्त स्थगित केले. यासाठी भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी समन्वय साधला. रणनवरे यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळाल्यानंतर राम कुलकर्णी यांनी दखल घेत त्यांनी ब्राह्मण समाजाच्या मागण्यांचा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर कुलकर्णी येथे दाखल झाले व रणनवरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. शासनाच्या संबंधित विभागांपर्यंत मागण्या प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. शासनाचे प्रतिनिधी म्हणून निवासी जिल्हाधिकारी रामदास दौंड, पोलिस उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी, तहसीलदार धैर्यशील गवळी उपस्थित होते. अंबाजोगाई पेशवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी प्रा. राहुल कुलकर्णी, डॉ महेश अकोलकर, योगेश जानतीकर, संजय देशपांडे, मधुसूदन दंडारे, आर.आर. जोशी, अरविंद देशपांडे, दिलीप जोशी, ॲड बळवंत नाईक, भूषण जोशी, राहुल याज्ञिक, अनिल दीक्षित, सिद्धिविनायक मुळे, विलास कुलकर्णी, मंदार कुलकर्णी, संतोष दाणी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. इन्फो मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक -- ब्राह्मण समाजाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत मुंबईत लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले. शासन सकारात्मक भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रणनवरे यांनी उपोषण स्थगित केले. परशुराम आर्थिक विकास महामंडळाला पुरेसा निधी उपलब्ध करून देणे, महामंडळावर अशासकीय सदस्य व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करणे, ब्राह्मण समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा, ईडब्ल्यूएस आरक्षणाची उत्पन्न मर्यादा वाढविणे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे मोफत सुरू करणे आदी मागण्या रणनवरे यांनी केल्या होत्या. ---- JL126B07739

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Munir: पाकिस्तानात पहिल्यांदाच असं घडलं; आसीम मुनीर यांच्या हातात सुपर पॉवर, देशाचं सत्ताकेंद्रच बदललं!

अमली पदार्थांची टीप दिल्याच्या संशयातून नगरसेवकाच्या घरावर गोळीबार; ७ आरोपी अटकेत, ५० हजारांची घेतली होती ‘सुपारी’

Pune Fraud News : हेलो, मी प्रिन्सिका जोशी बोलतेय....; मुलीच्या नावाने ‘स्नॅपचॅट’वर मैत्री अन्‌ दीड लाखाच्‍या 'क्रिप्टोकरन्सी'ला गंडा

Hingoli News : मनोज जरांगे पाटील यांची आमदार राजू नवघरे यांनी घेतली भेट; उपोषणस्थळी जाऊन तब्येतीची केली विचारपूस

Pune News : विद्यानंद बापट यांच्‍यावर हल्‍ला प्रकरणातील आरोपी संतोष चव्‍हाणला एक दिवसाची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT