छत्रपती संभाजीनगर

सुरताल संगीत सभा

CD
अँकर पान ३ --- फोटो, लातूर : सूरताल संगीत महाविद्यालयात गायन सादर करताना गायिका दीपिका गित्ते-डिगोळे. --- सुरांच्या अवीट गोडीने रंगली मैफल... सूरताल संगीत सभा, दीपिका यांच्या सुरेल गायनाने रसिक मंत्रमुग्ध --- सकाळ वत्तसेवा लातूर, ता. १४ : शास्त्रीय रागदारीपासून कजरी, भावगीत आणि अभंगांपर्यंतच्या सुरेल प्रवासाने सूरताल संगीत सभेची मैफल रंगतदार झाली. गायिका दीपिका गित्ते-डिगोळे यांच्या दमदार आणि भावपूर्ण गायकीला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. अखेरीस संत चोखामेळा यांच्या ‘अवघा रंग एक झाला’ या भैरवीने मैफलीची सांगता झाली आणि सभागृह सुरांच्या अनुभूतीने भारावून गेले. याप्रसंगी नगरसेवक इसरार सगरे, ओमप्रकाश झुरळे, बालाजी पिंपळे, माजी प्राचार्य डॉ. संजय गवई, उपप्राचार्य प्रा. संजय पवार, माधव महाराज चौधरी, उमेश गिरवलकर, सोमनाथ गित्ते, सोनू डगवाले आदी उपस्थित होते. डगवाले यांनी प्रास्ताविकातून सूरताल संगीत महाविद्यालयाच्या ५० वर्षांच्या सांगीतिक आणि शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेत गुरुजींच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर मुख्य सांगीतिक मैफलीला सुरवात झाली. दीपिका डिगोळे यांनी आपल्या गायनाची सुरवात राग मारू बिहागमधील विलंबित एकतालातील ‘बनरा मोरा आयो’ या बडा ख्यालने केली. त्यानंतर याच रागातील द्रुत लयीतील ‘मोरे नैनवा’ हा छोटा ख्याल सादर करून गायकीचे दर्शन घडवले. रागदारीनंतर त्यांनी सादर केलेल्या ‘आज बिरज में’ या प्रसिद्ध कजरीला व ‘मी अधना’, ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’ या गीतांना श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. त्यांना हार्मोनियमवर गणेश सुतार, तबल्यावर तेजस धुमाळ, तानपुऱ्यावर पूजा दहिफळे यांनी साथ केली. परमेश्वर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. -- भैरवीच्या स्वरांत मैफलीला भावपूर्ण निरोप मैफलीच्या उत्तरार्धात त्यांनी विठ्ठलभक्तीचा जागर करत ‘बोलावा विठ्ठल’, ‘पंढरीच्या वाटेवर’ आणि ‘चंद्र तेथे चंद्रिका’ ही भक्तिगीते सादर केली. कार्यक्रमाची सांगता संत चोखामेळा यांच्या ‘अवघा रंग एक झाला’ या भैरवीने झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Ahilyanagar Crime: खर्ड्यात तान्हाजी बोराडे खूनप्रकरणाचा दोन दिवसांत छडा; १८ वर्षीय तरुणासह तीन अल्पवयीन ताब्यात

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

SCROLL FOR NEXT