छत्रपती संभाजीनगर

वाया गेलेली पिके काढणीला तरीही ई-पीक पाहणी लटकलेलीच

CD
वाया गेलेली खरीप पिके काढणीला, तरीही ई-पीक पाहणी लटकलेलीच - जिल्ह्यात ३ लाख ६० हजार २९७ प्लॉटचे सर्वेक्षण बाकी - शेतात पीक न राहिल्यास ई-पीक पाहणी कशी करणार? - पुरावाच न उरल्यास दुष्काळी मदत, पीकविम्यावर राहणार टांगती तलवार .......... सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. १६ : जिल्ह्यात पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे सुकून गेलेली पिके काढण्यास शेतकऱ्यांनी सुरवात केली असून, मूग व उडदाची काढणीही सुरू आहे. खरीप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. शासनाकडे दुष्काळी परिस्थितीचा अहवाल सादर झालेला असला, तरी जिल्ह्यातील ई-पीक पाहणीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. शेतातील पिकांची काढणी पूर्ण झाली आणि ई-पीक पाहणी राहून गेली, तर दुष्काळी मदत आणि पीकविमा भरपाई मिळताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासकीय अहवालानुसार, बुधवारपर्यंत (ता. १६) जिल्ह्यातील एकूण ८ लाख ५५ हजार ३६३ प्लॉटपैकी ४ लाख ९५ हजार ६६ प्लॉटचे सर्वेक्षण झाले आहे. म्हणजेच अजूनही ३ लाख ६० हजार २९७ अर्थात ४०.८६ टक्के प्लॉटचे सर्व्हेक्षण होणे अजून बाकी आहे. दुसरीकडे सर्वेक्षण झालेल्या प्लाॅटचीही मंजुरीची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे. जिल्ह्यात एकूण अर्जांपैकी केवळ ३.१३ टक्के (२६ हजार ८०७ प्लॉट) अर्जांनाच मंजुरी मिळाली असून ४ लाख ६८ हजार २५९ अर्ज मंजुरीअभावी प्रलंबित आहेत. .............................. ((((((((((चौकट)) तालुकानिहाय ई-पीक पाहणीची स्थिती ः (१६ अखेर) तालुका...एकूण प्लॉट...सर्वेक्षण झालेले प्लॉट...सर्वेक्षण टक्के...मंजुरी प्रलंबित...मंजूरी पूर्ण भूम...१,२२,०३२...५९,९७९...५१.७०...५७,४२५...२,५५४ धाराशिव...१,४४,९७४...६९,४७९...५१.९६...६८,३७३...१,१०६ कळंब...१,२८,४२८...८२,०१६...६३.८६...७९,६६३...२,३५३ लोहारा...४८,२७३...३०,५२२...६३.२३...२७,५०५...३,०१७ उमरगा...१,०४,९५७...७४,१५६...७०.६५...६५,५९५...८,५६१ परंडा...९४,२८७...३४,९७५...३७.५०...३२,५१४...२,४६१ तुळजापूर...१,२९,३७८...८९,७१६...६९.३४...८६,५१६...३,२०० वाशी...८३,०३४...५४,२२३...६५.३०...५०,६६८...३,५५५ एकूण (जिल्हा)...८,५५,३६३...४,९५,०६६...५९.१४...४,६८,२५९...२६,८०७ ........................................................... ((चौकट)) ॲपद्वारे स्वतः करा पीक नोंदणी ई-पीक पाहणीचे काम अधिक जलद करण्यासाठी आणि शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी केंद्र शासनाच्या डीसीएच-एमएच मोबाइल ॲपमध्ये शेतकरी स्तरावरून पीक नोंदणी करण्याची सुविधा शुक्रवारपासून (ता. ११) उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मोबाइलमध्ये DCS ॲप डाऊनलोड करून स्वतःचा शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) प्रविष्ट करून, त्या क्रमांकाशी संलग्न असलेल्या सर्व शेतजमिनींच्या पिकांची नोंद स्वतः करू शकतात. पीक नोंदणीची अचूक माहिती विविध शासकीय अनुदान, विमा भरपाई व इतर योजनांच्या लाभासाठी अनिवार्य आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी विलंब न करता डीसीएच-एमएच मोबाईल ॲपद्वारे ई-पीक नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT