नेक लसीकरण केंद्रांवर नागरिक आले. परंतु त्यांना निराश होऊन परत जावे लागले. आता आरटीपीसीआर चाचणीही दोन दिवस बंद राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.  
छत्रपती संभाजीनगर

Delta : आता पॉझिटिव्ह रुग्णांच्या कुटुंबाची आरटीपीसीआर चाचणी

माधव इतबारे

औरंगाबाद : शहर परिसरात कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूचा (Delta Plus Variant In Auangabad) रुग्ण आढळून आल्याने महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. यापुढे पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपूर्ण कुटुंबाची आरटीपीसीआर चाचणी (RTPCR Test) केली जाईल, असे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. शहरात कोरोना संसर्गाची (Corona) दुसरी लाट महिनाभरापासून नियंत्रणात आहे. कधी पाच तर कधी दहा ते १५ असे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला होता. दरम्यान प्रशासनातर्फे तिसऱ्या लाटेची तयारी सुरू (Aurangabad) करण्यात आली होती. ऑक्सिजन, ऑक्सिजन बेडची उपलब्धता, बालकांसाठी विशेष कोविड केअर सेंटर अशी तयारी करण्यात आली आहे. असे असतानाच शहर परिसरात डेल्टा व्हेरियंटचा रूग्ण आढळून आला.

हा रुग्ण महिनाभरापूर्वी पॉझिटिव्ह आलेला असला तरी, खबरदारी म्हणून महापालिका प्रशासनाने विविध उपाय योजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार यापुढे एखादा कोरोनाबाधित आढळल्यास त्याच्या संपर्कात असलेल्या कुटुंबीयांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. यापूर्वी कुटुंबीयांच्या सोयीनुसार अँटीजेन किंवा आरटीपीसीआर चाचणी केली जात असे. पण आता आरटीपीसीआर चाचणीच बंधनकारक असेल, असे मंडलेचा म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update : पुणे शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Rawdogging Boredom: 'काहीही न करता बसणं' बनलं ट्रेंड! Gen Z चा "Rawdogging Boredom" फंडा आहे तरी काय?

IPL 2026: 'तो' ड्रेसिंग रूममधून पळत आला, डेव्हिड मिलरला फलंदाजीला जाण्यास रोखले अन्... DC च्या डग आऊटमधील Video Viral

SCROLL FOR NEXT