छत्रपती संभाजीनगर

Mukhed news2 कत च

CD
दाखले उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिरे घेण्याची मागणी मुखेड, ता. ४ (बातमीदार) : भटक्या समाजातील नागरिकांना आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, रहिवासी दाखला व जात प्रमाणपत्र यांसारख्या मूलभूत कागदपत्रांसाठी संघर्ष करावा लागत आहे. विविध दाखले उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भटक्या विमुक्त समाजाच्या वतीने तहसीलदार अभयराज नजुंडे व नायब तहसीलदार शालिनी घुळे यांना गुरुवारी (ता. तीन) निवेदन देऊन करण्यात आली. भटक्या समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध योजना, शैक्षणिक सवलती, घरकुल, रोजगार तसेच इतर कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली प्रमाणपत्रे सहज व विनाअडथळा उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. नागरिकांसाठी प्रशासनाने विशेष शिबिरे आयोजित करून एकाच ठिकाणी आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ करावी, अशीही मागणी करण्यात आली. ‘कागदपत्रांच्या अभावामुळे योजनांपासून वंचित ठेवू नका; तर योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सुलभपणे उपलब्ध करून द्या,’ अशी भूमिका यावेळी उपस्थितांनी मांडली. यावेळी नगरसेवक विनोद दंडलवाड, भटक्या समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास हादवे, जिल्हा सचिव ज्ञानेश्वर डोईजड, संगीताबाई पंचलिंगे, दिलीप बाबर, धर्मनाथ चव्हाण, विलास शिंदे, सागर चव्हाण, रामजी डोईजड, संजय शिंदे, शिवनाथ चव्हाण, शिवाजी बाबर, अरुण शिंदे, भानू बाबर, महेंद्र चव्हाण, खंडू चव्हाण, लक्ष्मण बाबर, चांदू मेटकर, शिंदे बेटमोगरेकर यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal flood: नेपाळ महापूर! नऊ दिवस फक्त 'हरे कृष्ण'चा जप अन् ऐन जन्माष्टमीच्या दिवशी बोगद्यातून जिवंत बाहेर काढलं

Japanese Habits for Stress Relief: सतत टेन्शनमध्ये असता? स्ट्रेसपासून दूर राहायचंय? मग जपानी पद्धतीच्या ‘या’ ४ सवयी आजच अंगीकारा!

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या नावावर मोठा विक्रम; पंतप्रधान मोदींनीही दिल्या शुभेच्छा, नेमकं काय म्हणाले?

Marathi News Live Updates : पुण्यात डीजेविरोधात आणि वाहतूक कोंडीच्या विरोधात आंदोलनाची हाक

Nagpur Vehicle Theft Case: गोळीबारातील आरोपीला वाहनचोरी प्रकरणात अटक; साथीदारही ताब्यात; गणेशपेठ पोलिसांनी केली कारवाई

SCROLL FOR NEXT