Chatrapati Sambhaji Nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Chatrapati Sambhaji Nagar : वाहतुकीची फुटणार कोंडी रेल्वेच्या भुयारी मार्गासाठी शिवाजीनगर येथे पाडापाडी

मालमत्ताधारकांनी स्वतः काढली बांधकामे, भूसंपादन कार्यालयाने सात मालमत्ताधारकांना सहा कोटी ९७ लाख ९२ हजार ९१ रुपये एवढा मोबदला दिला

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शिवाजीनगर येथील रेल्वे भुयारी मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मालमत्तांच्या पाडापाडीला शुक्रवारपासून (ता.२१) सुरवात झाली. विशेष भूसंपादन अधिकारी विश्वनाथ दहे यांच्या उपस्थितीत काही मालमत्ताधारकांनी स्वतःच बांधकामे काढून घेत जमिनीचा ताबा महापालिकेला दिला.

शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी न्यायालयाच्या आदेशानंतर समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली. सातारा गट नंबर १२४/२ व १३१ मधील अस्तित्वातील रस्त्याचे २४ मीटर रुंदीकरण करण्यासाठी प्रारूप निवाड्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यानंतर विशेष भूसंपादन कार्यालयाने सात मालमत्ताधारकांना सहा कोटी ९७ लाख ९२ हजार ९१ रुपये एवढा मोबदला दिला.

मालमत्ताधारकांना मोबदला दिल्यानंतर नोटिसा बजावण्यात आल्या व मालमत्तांवर मार्किंग करण्यात आली. शुक्रवारपासून जमिनीचा ताबा देण्यासाठी मालमत्ताधारकांनी बांधकामे काढून घेण्यास सुरवात केली.

त्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथक दाखल झाले. देवळाई चौकातून रेल्वेगेटकडे येताना डाव्या बाजूने असलेली बांधकामे काढण्यात आली. त्यानंतर विशेष भूसंपादन अधिकारी विश्वनाथ दहे यांच्या उपस्थितीत जमिनीचा महापालिकेच्या ताब्यात देण्यात आल्या.

भूसंपादनाचा तिढा सुटल्यानंतर रेल्वेगेट भुयारी मार्गासाठी रेल्वेचा भाग वगळून इतर कामाची निविदा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राबविली जाणार आहे. रेल्वे विभागाकडून देखील स्वतंत्र निविदा काढण्यात येणार आहे.

वाहतुकीची फुटणार कोंडी बीड बायपास परिसरात राहणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असल्यामुळे शिवाजीनगरात रेल्वे येताच दोन्ही बाजूने वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

अनेकवेळा तर एका रेल्वेमुळे ठप्प झालेली वाहतूक सुरळीत होईपर्यंत दुसरी रेल्वे दाखल होते. त्यामुळे भुयारी मार्ग झाल्यास सातारा, देवळाई, गांधेली, बाळापूर यासह या इतर भागातील नागरिकांना फायदा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT