छत्रपती संभाजीनगर

कीटकजन्य आजारांचा धोका वाढला

CD
कीटकजन्य आजारांचा धोका वाढला आरोग्य विभागाचे सतर्कतेचे आवाहन, कोरडा दिवस पाळण्याचे निर्देश सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. ८ ः साचलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यात डेंगी, हिवताप (मलेरिया) यासारख्या कीटकजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि कोणताही ताप अंगावर न काढता तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाने केले आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनयशील कुलकर्णी यांनी संयुक्तपणे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत. ......... कोणताही ताप अंगावर काढू नका ताप, अंगदुखी, तीव्र डोकेदुखी, थंडी वाजणे किंवा अशक्तपणा यासारखी लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वैद्यकीय दुकानातून स्वतःच्या मनाने औषधे घेणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. तापाचे नेमके कारण समजून घेण्यासाठी जवळच्या शासकीय किंवा अधिकृत आरोग्य केंद्रात जाऊन रक्ताची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे. ....... नागरिकांचा सहभाग आवश्यक कीटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी केवळ शासकीय यंत्रणा पुरेशी नसून प्रत्येक कुटुंबाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. नागरिकांनी आपल्या घराच्या आत आणि परिसरात पाणी साचणार नाही याची खबरदारी घेतल्यास कीटकजन्य आजारांचा प्रसार सहजरीत्या रोखता येईल, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आठवणीतील भेट : पेट्रोल पंपावरचा तो मुलगा नानांना पाहतच बसला...

Nana Patekar Passes Away : "पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती..."; वयाच्या १३ व्या वर्षी सुरू झालेली नाना पाटेकरांची 'दोन गुरूं'ची भावुक आत्मकहाणी

Nana Patekar :अंगावर काटा आणणारा संघर्ष ! नानांचा संपूर्ण जीवनप्रवास !

SA vs AUS Schedule: ८ वर्षांनंतर जुने हिशोब चुकते होणार?'सँडपेपरगेट' राड्यानंतर पुन्हा ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेत खेळणार

Latest Marathi News Live Update: अतिक्रमण हटाव पथकाची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT