Aurangabad Esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad: नामांतर शहराचं की जिल्ह्याचे? विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न अन् उपमुख्यमंत्र्यांचं उत्तर!

उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामकरणास केंद्र सरकारकडून मंजुरी

सकाळ डिजिटल टीम

उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली. संबधित नावावरुन नवा संभ्रम निर्माण झाला आहे. धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर ही नावे फक्त शहराची बदलली गेली आहेत, की संपूर्ण जिल्ह्याचेच नामकरण होणार आहे. याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

अशातच ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंबधीचा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी ट्विट करत "हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणं अपेक्षित असल्याचे म्हंटले आहे." तर अंबादास दानवे यांच्या या प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत, त्यांना संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली आहे.

अंबादास दानवे यांचा प्रश्न

"हे नामांतर फक्त संभाजीनगर शहराचे आहे की संपूर्ण जिल्ह्याचे, यावर केंद्राने स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. औरंगजेबाचे नाव मिटवायचे असेल तर जिल्हा पण संभाजीनगर असावा. ता. 'छत्रपती संभाजीनगर जिल्हा औरंगाबाद', असे यापुढे लिहावे लागेल का? हे पण सांगावे." असं ट्वीट विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं आहे. दानवे यांनी हे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टॅग केलं आहे. दरम्यान, अंबादास दानवेंच्या या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं ट्विट शेअर करत उत्तर दिलं आहे.

उत्तर देताना काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

"अंबादास जी, आधी पूर्ण प्रक्रिया समजून घ्या. केंद्र सरकारची मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली की, आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते. तेव्हा शहरांची नावे बदलतात. ही अधिसूचना जारी झाली आहे. त्यानुसार औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर' आणि उस्मानाबादचे 'धाराशिव' असे नामकरण झाले आहे. त्यानंतर महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभाग अधिसूचना जारी करेल. तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचे सुद्धा नाव बदलेल. दोन्ही जिल्ह्यांसंदर्भात याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा काही करतो तेव्हा ते पूर्णच करतो. अर्धवट काहीच ठेवत नाही" असं ट्वीट करत देवेंद्र फडणवीसांनी अंबादास दानवे यांच्या प्रश्नावर उत्तर देत नामांतराची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT