Devendra Fadnavis 
छत्रपती संभाजीनगर

Devendra Fadnavis : संभाजीनगरमधील राड्यावर गृहमंत्र्यांचे आवाहन! म्हणाले, "काही नेते जाणीवपूर्वक..."

Sandip Kapde

छत्रपती संभाजीनगरमधील किऱ्हाडपुरा येथे दोन समुदायांमध्ये प्रचंड हिंसाचार झाला आहे. किराडपुरा येथील राममंदिराबाहेर रात्री साडेबारा वाजता दोन तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. यानंतर काही लोक मोठ्या संख्येने जमा झाले. यानंतर दगडफेक सुरू झाली. हल्लेखोरांनी अनेक वाहनांना आग लावली. हल्लेखोरांनी पोलिसांची वाहनेही पेटवून दिली.

दरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीनगरमधील घटना दुर्दैवी आहे. त्या ठिकाणी शांतता प्रस्तापित करण्याचा प्रयत्न आहे. मात्र काही लोकांचा प्रयत्न आहे की भडकवणारे स्टेटमेंट देऊन परिस्थिती चिघळली पाहीजे. अशा नेत्यांनी कसे वागले पाहिजे हे समजून घेण्याची गरज आहे. चुकीचे स्टेटमेंट देऊ नये सर्वांनी शांतता पाळावी. याला राजकीय रंग देण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर त्यापेक्षा दुर्दैवी काहीच नाही, असे फडणवीस म्हणाले.

हेही वाचा - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

आता संभाजीनगरमध्ये शांतता आहे. ही शांतता अशीच राहिली पाहिजे. काही नेते जाणीवपूर्वक राजकीय स्टेटमेंट देऊन परिस्थिती चिघळली पाहिजे म्हणून स्टेटमेंट देत आहेत. ते त्यांनी देऊ नये, असे फडणवीस म्हणाले. 

चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप - 

चंद्रकांत खैरे म्हणाले की, भाजप आणि देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री भागवत कराड आणि इम्तियाज जलील हे सगळे दोस्त आहेत. महानगरपालिका, विधानसभा- लोकसभा, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणूकासाठी हा गेम केला जात आहे. हे भागवत कराड आणि इम्तियाज जलील या दोघांचं प्लॅनिंग आहे.

देवेंद्र फडणवीस यात मुख्य आहेत आणि त्यांनी हे राजकारण करून महाराष्ट्राच्या जनतेस वेठीस धरलं आहे, असेही खैरे यावेळी म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-LPG Price Today: कच्चे तेल 10% ने घसरले! पेट्रोल-डिझेल, CNG आणि LPG चे नवे दर जाहीर; पाहा तुमच्या शहरातील भाव

Mumbai: अय्यंगार बेकरीवर FDAची धाड! केकमध्ये उंदराची विष्ठा आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल, दोन मुलींसह नगरसेविका आजारी

Ratnagiri Leopard Deaths : कोकणात बिबट्यांची डरकाळी धोक्यात? 11 वर्षांत 90 बिबट्यांनी गमावला जीव; वन विभागाकडून रेस्क्यूचे प्रयत्न सुरू

पोट चाकूने कापेन! धमकावत ६५ वर्षीय वृद्धाचा सख्ख्या बहिणींवर अत्याचार, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना

India’s Test squad for Sri Lanka: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर; रवींद्र जडेजाचे पुनरागमन, उप कर्णधार बदलला...

SCROLL FOR NEXT