Devendra Fadnavis esakal
छत्रपती संभाजीनगर

Cabinet Meeting : मराठवाड्यातील मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले इतके वर्ष माशा...

रोहित कणसे

Marathwada Cabinet meeting : छत्रपती संभाजीनगर येथे आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्य सरकाकडून काही मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. यादरम्यान या बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दाखल झाले आहेत. दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे पोहचलेल्या फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मागच्यावेळी मंत्रिमंडळाची जी बैठक संभाजीनगरमध्ये झाली होती त्या बैठकीत घेतलेल्या जवळपास सर्व निर्णयाची अंमलबजावणी झाली आहे. एखाद-दुसरा शेवटच्या टप्प्यात आहे, कारण त्यात काही अडचणी आहेत. याची माहिती आम्ही माध्यमांना देणार आहोत. जे लोकं मागच्या बैठकीत काय झालं? असं विचारत आहेत त्यांनी ते वाचून घ्यावं.

माझा त्यांना सवाल आहे, अडीच वर्षांमध्ये मराठवाड्यासाठी तुम्ही काय केलं? तुम्ही सरकारमध्ये होते, एखादा निर्णय मागे राहिला असेल तर तो पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची होती. तुम्ही अडीच वर्षे माशा मारत होतात का? असा सवाल फडणवीस यांनी केला.

मराठवाडा वॉटर ग्रीडचा मुडदा पाडण्याचं काम ज्या सरकारने केलं आता तेच लोकं मराठवाड्याला काय मिळालं असं विचारतात. यांना मराठवाड्याशी देणं घेणं नाहीये. यांना केवळ राजकारण करायचं आहे, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठवाड्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक बैठक होत असून या बैठकीवरून विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. मराठवाड्यामध्ये तब्बल सात वर्षांनी होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. आता मराठवाड्याला थेट निधी मिळणार की पुन्हा नुसताच घोषणांचा पाऊस पडणार, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

सात वर्षांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील घोषणांची पूर्तता आधी करावी. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ मध्ये मराठवाडा विकासाचा ४९ हजार कोटींचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला होता, त्यापैकी १-२ टक्केच कामे झाली आहेत असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT