छत्रपती संभाजीनगर

तेलंगणातील ब्लॉकमुळे ''देवगिरी'' होणार लेट

CD
तेलंगणातील ब्लॉकमुळे ‘देवगिरी’ होणार लेट .... छत्रपती संभाजीनगर, ता. २६ : तेलंगणात दक्षिण मध्य रेल्वेने विविध कामे हाती घेतली असून, त्याचा फटका देवगिरी एक्स्प्रेस आणि काचीगुडा-पूर्णा या रेल्वेंना बसणार आहे. नोव्हेंबर महिन्यात या दोन्ही गाड्या सात दिवस एक तास उशिराने धावणार आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद विभागात मेडचल-अक्कन्नापेट दरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. शिवाय मनोहराबाद यार्ड येथे अतिरिक्त नवीन रेल्वे मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी प्री-नॉन इंटरलॉकिंग व नॉन इंटरलॉकिंगची कामे करण्यात येणार आहेत. १४ नोव्हेंबरपासून २२ नोव्हेंबरपर्यंत ही कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम होणार आहे. मराठवाड्यातून धावणाऱ्या दोन रेल्वेंना एक तास विलंब होणार आहे. १५ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-लिंगमपल्ली देवगिरी एक्स्प्रेसच्या सात फेऱ्या एक तास विलंबाने होतील. १६ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत लिंगमपल्ली-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई देवगिरी एक्स्प्रेसच्या सात फेऱ्या एक तास विलंबाने धावतील. १६ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत काचीगुडा-पूर्णा रेल्वेगाडीच्या सात फेऱ्या एक तास विलंबाने धावतील. याशिवाय १४ ते २० नोव्हेंबर कालावधीत भगत की कोठी-काचीगुडा एक्स्प्रेस ही रेल्वे सात दिवस ७५ मिनिटे उशिराने धावेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत जागतिक दर्जाचे मरीना उभारणार, ९२३ कोटींचा प्रकल्पाची घोषणा; सुरक्षिततेला प्राधान्य

Beed Crime : चमत्काराचा बहाणा करून वृद्धाला लुबाडणारा सराईत जेरबंद; परळी बसस्थानकातील अंगठी लांबवणाऱ्या नाशिकच्या ठगास एलसीबीच्या बेड्या

Maharashtra Live News: छत्रपती कारखान्याचे १५ दिवसात १ लाख ७३५३ टन उसाचे गाळप

E-Bus Fire : पुण्यात चालत्या ई-बसला आग; १७ प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला!

दिल्लीतील धुक्याचा भारत श्रीलंका वनडे सामन्याला फटका बसणार? रोहित विराटच्या चाहत्यांची धाकधूक वाढली, सामना दुसरीकडे हलवण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT