sambhaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar News : कोळी संघटनांचा धडक मोर्चा

२९ डिसेंबरपासून करणार अन्नत्याग आंदोलन

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

छत्रपती संभाजीनगर, ता. ८ ः डोंगर रांगेतील व मराठवाड्यातील आदिवासी कोळी मल्हार, कोळी महादेव, कोळी टोकरे जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करावे, यासह इतर विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा काढत आदिवासी जात पडताळणी समिती कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

मागणीची पूर्तता २९ डिसेंबरपर्यंत झाली नाही कर धोत्रा (ता. सिल्लोड) येथे अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा कोळी जमात व धाडस सामाजिक संघटनेने दिला आहे. आदिवासी कोळी मल्हार, कोळी महादेव, कोळी टोकरे हा जनसमुदाय अजिंठा डोंगर रांगाच्या सांनिध्यात व मराठवाड्यात मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. या जमातीला संविधानाच्या कलम ३४२ नुसार आरक्षण दिलेले आहे.

मागील १९७६ पासून या जमातीला विनाअट जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र अगोदरच्या अधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले आहेत. शासनाच्या २ ऑगस्ट २००४ च्या अन्वये अर्जदाराकडून सरसकट वर्ष १९५० चा पुरावा न मागता त्यांची जमात वर्ष १९५०, वर्ष १९५६ किंवा १९७६ यापैकी ज्या आदेशान्वये या अधिनियमान्वये घोषित केलेली असेल त्या तारखेपासून पुरावा घेणे आवश्यक आहे. असे असतानाही अर्जदारास त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र देण्यापासून वंचित ठेवत आहेत. या विरोधात जाधववाडी सिग्नलपासून आदिवासी जात पडताळणी कार्यालयापर्यंत (सिडको) धडक मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. हे आंदोलन धाडसचे संस्थापक शरद कोळी, जिल्हाध्यक्ष आकाश पाडळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

अशा आहेत मागण्या

  • रक्त नात्यामधील जात वैधता असणाऱ्या व्यक्तींना कोणतीही अट न लावता जात वैधता निर्गमित करावे.

  • अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय प्रमाणे रक्त नात्यातील जात वैधता प्रमाणपत्राच्या आधारावर जात वैधता प्रमाणपत्र द्यावे.

  • २४ नोव्हेंबर २०१७ चे राजपत्र अनुसूचित जमातीसाठी लागू करावे.

  • माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या कार्यकाळात प्रमाणपत्र दिलेल्या निकषानुसार समान न्यायाने कोळी मल्हार, कोळी महादेव, कोळी टोकरे जमातींना जात वैधता प्रमाणपत्र द्यावे.

  • निजामकालीन व ब्रिटीशकालीन जनगणना विभागाचे प्रमुख यांच्या आदेशानुसार या जमातीचे प्रकरणे अवैध ठरवू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Pune News : दहीहंडीत विनापरवाना लावणी; नृत्यांगणांसह आयोजकांवर गुन्हे

स्टार प्रवाहचं वेळापत्रक बदललं! ‘मी कात टाकली’साठी ‘या’ लोकप्रिय मालिकेला नवी वेळ; आता किती वाजता होणार प्रसारित?

SCROLL FOR NEXT