छत्रपती संभाजीनगर

येरमाळ्यात पिकअपमधून गोवंशीय जनावरांची दाटीवाटीने वाहतूक; २.७६ लाखांचा मुद्देमाल जप्त चारापाण्याची व्यवस्था नसताना जनावरांची वाहतूक; येरमाळा पोलिसांची कारवाई, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

CD
फोटो ओळ : BMH26A10134 भूम ः दिवंगत होमगार्ड धनाजी कांबळे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत सुपूर्द करताना भूम तालुक्यातील होमगार्ड बांधव. भूम तालुका होमगार्ड पथकाकडून आर्थिक मदत भूम : नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्तादरम्यान निधन झालेले भूम तालुका होमगार्ड पथकातील जवान धनाजी कांबळे यांच्या कुटुंबीयांना होमगार्ड बांधवांनी आर्थिक मदत केली. तालुक्यातील सर्व होमगार्ड बांधवांनी एकत्र येत २५ हजार रुपयांची मदत त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केली. धनाजी कांबळे यांचे कर्तव्यावर असताना निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या परिस्थितीत सहकाऱ्यांनी एकजूट दाखवत कुटुंबाला आधार दिला. यावेळी कांबळे यांचे आई-वडील, भाऊ, गावचे पोलिस पाटील तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तालुका समादेशक अधिकारी रवी गाढवे, पलटण नायक अंकुश थोरात, सार्जंट औदुंबर जाधव, सागर माने, संभाजी चौधरी यांच्यासह होमगार्ड बांधव उपस्थित होते. ................. ACL26A00647 भास्करराव पेरे पाटील पेरे पाटील यांचे बुधवारी व्याख्यान अचलेर : पाटोद्याचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे उमरगा तालुक्यातील आलूर येथे बुधवारी (ता. ११) सायंकाळी सातला व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील जिल्हा परिषद प्राथमिक मुलांच्या शाळेत ग्रामविकासाचा यशस्वी मूलमंत्र या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. पाटोदा गावाच्या विकासाचा आदर्श समोर ठेवून आदर्श सरपंचाची भूमिका, सरपंचांचे अधिकार व कर्तव्ये, तसेच गावाच्या विकासात ग्रामस्थांचे योगदान याविषयी ते मार्गदर्शन करतील. या व्याख्यानाचा लाभ परिसरातील नागरिक, महिला, युवक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी घ्यावा, असे आवाहन आलूर व्यापारी महासंघ व समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. ................... NUG26A02323 नळदुर्ग : महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना साडी-चोळी व फराळाचे वाटप करताना नगराध्यक्ष बसवराज धरणे, नगरसेवक व कर्मचारी. महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना साडी-चोळी, फराळाचे वाटप नळदुर्ग, ता. ९ (बातमीदार) : शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या नळदुर्ग नगरपालिकेतील महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना नगराध्यक्ष बसवराज धरणे यांच्या वतीने साडी-चोळी आणि दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. शहराची स्वच्छता राखण्यात स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांच्या कामाची दखल घेत सणासुदीच्या काळात त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. अरविंद बेडगे, भाजपचे गटनेते दत्तात्रय दासकर, माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर, अभियंता स्वप्नील काळे, अविनाश नरवडे, बलदेव ठाकूर, विकास कांबळे, तानाजी गायकवाड यांच्यासह नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते. ............... GSM26A00340 घारगाव : रांजणी येथे हरिओम गोरे यांचा एचव्हीजी ग्रुप घारगावच्या वतीने सत्कार करण्यात आला. हरिओम गोरे यांचा रांजणी येथे सत्कार घारगाव, ता. ९ (बातमीदार) : कळंब तालुक्यातील रांजणी येथील हरिओम गोरे यांचा एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबद्दल एचव्हीजी ग्रुप घारगावच्या वतीने सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागात राहून जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हरिओम यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळविला. या यशाबद्दल या वेळी डॉ. विलास जगताप, ग्रुपचे अध्यक्ष अभय कुंभकर्ण, उपाध्यक्ष आसरेश्वर शितोळे, माजी उपसरपंच अरुण कांबळे, माजी सैनिक व्यंकट निकम, परमेश्वर घोडके, कमलाकर साळुंके यांच्यासह गोरे कुटुंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते. .................... शिधा वाटपातून गरजू कुटुंबांची दिवाळी गोड कळंब, ता. ९ (बातमीदार) : शिवसेनेच्या वतीने शिधा वाटप करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू असलेल्या या अभियानाअंतर्गत कळंब शहरातील कल्पनानगर परिसरातील गरजू कुटुंबांना दिवाळी शिध्याचे वाटप करण्यात आले. अजित पिंगळे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, शेतमजूर आणि दुर्बल घटकांतील कुटुंबांना सणाचा आनंद घेता यावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. सणाच्या काळात गरजूंच्या सुख-दुःखात सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. ........................ गोवंशीय जनावरांची वाहतूक; वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल कळंब : बार्शी-कळंब महामार्गावरील येरमाळा येथे पिकअप वाहनातून गोवंशीय जनावरांची दाटीवाटीने आणि चारा-पाण्याची व्यवस्था न करता वाहतूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. येरमाळा पोलिसांनी रविवारी (ता. आठ) सायंकाळी कारवाई करून जनावरांसह वाहन, असा दोन लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश दिलीप चौधरी (रा. पिंपळवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर) हा जावेद कलेक्शनसमोर पिकअपमधून जनावरांची वाहतूक करताना आढळला. वाहनात एक जर्सी गायीचे खोंड, दोन कारवडी, एक जर्सी गाय आणि एक बैल अशी पाच जनावरे होती. त्यांना दाटीवाटीने कोंबून चारा-पाण्याची व्यवस्था न करता वाहतूक केली जात होती. या प्रकरणी संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Politics : "गोकुळचं दार मी उघडलं म्हणून..."; महायुतीच्या दोन बड्या मंत्र्यांवर सतेज पाटलांचा थेट प्रहार!

AI Hallucination: धक्कादायक! सरकारी आदेशातच चक्क सुप्रीम कोर्टाचे बनावट निकाल? मुंबई उच्च न्यायालयाने काय केले पाहा...

Diwali Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँकांना सुट्ट्यांची मेजवानी! महाराष्ट्रासह 'या' ३ राज्यांत राहणार बंद; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Rocket Firecrackers Ban: दिवाळीच्या उत्साहावर नियमांचं बंधन! मुंबईत रॉकेट फटाक्यांवर बंदी; महापालिकेचा मोठा निर्णय

Maharashtra Live News: "उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनील तटकरेंनीच दादांचा घात केला"; रामदास कदमांच्या विधानामुळे महायुतीत खळबळ

SCROLL FOR NEXT