छत्रपती संभाजीनगर

धाराशिवमध्ये कुष्ठरोगाविरुद्ध ‘घराघरांत’ मोहीम!

CD
धाराशिवमध्ये कुष्ठरोगाविरुद्ध ‘घराघरांत’ मोहीम! ---- संशयितांचा शोध घेणार; ३८६ गावांत ५ लाख ८५ हजार नागरिकांची तपासणी ----- धाराशिव, ता. ५ (बातमीदार) ः राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत विशेष कुष्ठरोग सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील ३८६ गावे, शहरी भागातील एक लाख १४ हजार २११ घरांना भेटी देऊन पाच लाख ८५ हजार ८५९ नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. या मोहिमेला १६ सप्टेंबरपासून प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत दोन हजार ५७२ नवीन कुष्ठरुग्ण आढळले आहेत. यामध्ये ६१२ सांसर्गिक रुग्ण, ६१ बालरुग्ण, ग्रेड-एक विकृती असलेले ३७ रुग्ण, ग्रेड-दोन विकृती असलेला एक रुग्ण आढळला आहे. ग्रेड-दोन विकृती असलेला रुग्ण हा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील असून, ऊसतोड मजूर म्हणून जिल्ह्यात आला होता. गेल्या पाच वर्षांत निदान झालेल्या कुष्ठरुग्णांच्या नजीकच्या सहवासितांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी ५९१ गावांची निवड करण्यात आली असून, २१ हजार ३४१ सहवासितांची तपासणी केली जाणार आहे. नवीन निदान निश्चित झालेल्या कुष्ठरुग्णांच्या नजीकच्या सहवासितांची तपासणी करून कुष्ठरोगाचा प्रसार रोखण्यासाठी पात्र सहवासितांना पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिसअंतर्गत रिफॅम्पिसिनची एक मात्रा देण्यात येणार आहे. कुष्ठरोगाच्या संपर्कातील पात्र व्यक्तींना सिंगल-डोस रिफॅम्पिसिन देणे ही संसर्गाचा प्रसार कमी करण्यासाठी मान्यताप्राप्त प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे. कुष्ठरोगाची तपासणी, बहुविध औषधोपचार सर्व शासकीय दवाखान्यांमध्ये मोफत उपलब्ध आहेत. कुष्ठरोगाचे निदान झालेल्यांनी उपचारामध्ये खंड न पाडता नियमितपणे औषधोपचार पूर्ण करणे आवश्यक आहे. बहुसांसर्गिक कुष्ठरुग्णांसाठी १२ महिने, अल्पसांसर्गिक कुष्ठरुग्णांसाठी सहा महिने नियमित बहुविध औषधोपचार घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी घरोघरी तपासणीसाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, सहायक संचालक, आरोग्यसेवा कुष्ठरोग डॉ. मारुती कोरे यांनी केले आहे. ---- रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये घरोघरी सर्वेक्षण गेल्या पाच वर्षांत सांसर्गिक रुग्ण, बालरुग्ण किंवा विकृती असलेले रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविकांच्या मदतीने घरोघरी जाऊन विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे. फोकस्ड लेप्रसी कॅम्पेनअंतर्गत ३८६ गावे, शहरी भागांची निवड करण्यात आली आहे. तपासणीमध्ये आढळणाऱ्या संशयितांची पुढील तपासणी केली जाईल. निदान झालेल्या रुग्णांना तत्काळ उपचार, त्यांच्या नजीकच्या सहवासितांची तपासणी, पात्र सहवासितांना पीईपीअंतर्गत रिफॅम्पिसिनची एक मात्रा देऊन कुष्ठरोग संसर्ग साखळी तोडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT