छत्रपती संभाजीनगर

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

CD
धाराशिवच्या तायक्वांदोपटूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड विभागीय स्पर्धेत २६ सुवर्ण, १० रौप्य व तीन कांस्यपदकांची कमाई धाराशिव, ता. ७ (बातमीदार) : नांदेड येथील श्री गुरू गोविंदसिंग स्टेडिअममध्ये झालेल्या विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत धाराशिव जिल्ह्यातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करीत विभागात प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेतील २६ खेळाडूंची अकोला येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विभागीय स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील खेळाडूंनी सहभाग घेतला. धाराशिवच्या खेळाडूंनी २६ सुवर्ण, १० रौप्य व तीन कांस्यपदकांसह विभागात अव्वल स्थान मिळविले. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये गणेश कडेकर, रणवीर सूर्यवंशी, रोहित गोरे, समर्थ साठे, संग्राम लोमटे, सात्विक इंगळे, आरोही थोरात, सृष्टी गायकवाड, आराध्या सोनटक्के, प्रणवी वायकर, प्रांजल भुतेकर, स्वरा कांबळे, अर्णव ढेकणे, कार्तिक जटनुरे, प्रतीक शिंदे, अनिकेत शिंदे, स्वराज कांबळे, ऋत्विक ठाकर, संस्कृती नलावडे, संस्कृती कपाळे, ज्ञानेश्वरी कुंभार, तन्वी कोरे, मधुरा महाजन, दिव्या कोने, वैष्णवी साळुंखे व साक्षी डावकरे यांचा समावेश आहे. रौप्यपदक विजेत्यांमध्ये अनुष्का कोरे, श्रुती अंबार, तेजस्विनी बांगर, स्वराली पडवळ, वैभव गायकवाड, शेख आदिब, देवराज गिरी, अली मुलानी, यश गायकवाड व ओंकार भोसले, तर कांस्यपदक विजेत्यांमध्ये समर्थ मस्के व ओम पाटील यांचा समावेश आहे. सुवर्णपदक विजेते खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेत लातूर विभागाचे प्रतिनिधित्व करतील. त्यांना मुख्य प्रशिक्षक राजेश महाजन, अनिल बळवंत, राम दराडे, स्मिता गायकवाड, माधव महाजन व पूजा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, उपाध्यक्ष जी. बी. कासराळे, किरण वैद्य, सूर्यकांत वाघमारे व रवींद्र जाधव यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.अ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Jantar Mantar Protest: शनिवारी सीजेपीचं पुन्हा 'जंतरमंतर'! मुख्य प्रवक्ते सौरव दास दिल्ली पोलिसांच्या भेटीला, म्हणाले...

IND vs WI 2nd T20I: नितीश रेड्डी, प्रिन्स यादव IN, वैभव सूर्यवंशी बाकावरच; दुसऱ्या ट्वेंटी-२० साठी Playing XI मध्ये सूचवला बदल

Sangli District Bank Election : आमदार सुरेश खाडेंसह सात जणांचे अर्ज बाद; पडळकर, विशाल पाटील, देशमुख यांना दिलासा, 21 जागांसाठी 295 अर्ज

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र, कर्नाटकातील हंगाम एकाच वेळी, राजू शेट्टी यांची जयसिंगपूरमध्ये शनिवारी ऊस परिषद

थिएटर फुटलं, अंधारातून पळालो, नानाने मला रिक्षात टाकलं अन् स्वतः... अशोक मामांनी सांगितला तो प्रसंग, काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT