पान एक बॉटम
----
OSM26B07031
धाराशिव ः नळदुर्ग किल्ल्यातील झालेले बांधकाम.
----
ऐतिहासिक, धार्मिक वारशांना आधुनिकतेचा स्पर्श
धाराशिवमधील २९ स्मारकांचा होणार कायापालट; १४ कोटींच्या निधीतून पर्यटन विकासाला चालना
धाराशिव, ता. १८ : प्राचीन लेणी, नळदुर्ग-परंड्याचा दिमाखदार इतिहास, संत गोरोबाकाकांची पावन भूमी तेर आणि आई तुळजाभवानीच्या अथांग श्रद्धेची सांगड लाभलेल्या धाराशिवच्या पर्यटनाला आता नवी झळाळी मिळणार आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक व धार्मिक वारसा जपत भाविक आणि पर्यटकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध पावले उचलली आहेत. पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील २९ राज्य संरक्षित स्मारकांचे संवर्धन करून पर्यटनस्थळांचा विकास केला जात आहे.
.........
या स्थळांवर कामे सुरू ः
- तुळजापूर येथील प्रसिद्ध घाटशीळ मंदिर
- वडगाव (देव) येथील खंडोबा मंदिर
- धाराशिव लेणी
- चामर (चांभार) लेणी
- नळदुर्ग किल्ला (भाग-२)
..........
आणखी ३ ऐतिहासिक स्थळांच्या विकासाचा प्रस्ताव ः
पर्यटन साखळी अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत उपळा येथील त्रिकुटेश्वर मंदिर, तेर येथील मुलानी टेकडी आणि धाराशिव येथील शिवगुरू समाधी या तीन महत्त्वपूर्ण स्थळांच्या संवर्धनाचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे.
.......
२९ संरक्षित स्मारकांमुळे इतिहास होणार जिवंत ः
धाराशिव लेणी, तेरचे त्रिविक्रम मंदिर, संत गोरोबा काकांचे घर, तुळजापूरचे भवानी मंदिर, नळदुर्ग व परंडा भुईकोट किल्ले, माणकेश्वरचे महादेव मंदिर आणि वडगाव-शेंद्री येथील महाअश्मकालीन स्थळांसह एकूण २९ स्मारके राज्य संरक्षित घोषित आहेत. या सर्व स्थळांना परस्परांशी जोडून एकात्मिक पर्यटन परिपथ तयार केले जात आहे.
.......
स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि रोजगाराला मिळणार बळ ः
पर्यटनाच्या या विकासामुळे केवळ वास्तूंचे सुशोभीकरण होणार नसून, स्थानिक वाहतूक, निवास, उपाहारगृहे, पूजा-प्रसाद विक्रेते, हस्तकला आणि स्थानिक सुशिक्षित नवयुवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. ‘वारसा जपूया, पर्यटन वाढवूया’ या सूत्रावर आधारित हा उपक्रम धाराशिवच्या पर्यटन क्षेत्रात मोलाची कामगिरी करणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
.....
१४ कोटी ३४ लाखांचा निधी मंजूर
जिल्हा नियोजन समितीअंतर्गत गड-किल्ले, प्राचीन मंदिरे आणि स्मारकांच्या संवर्धनासाठी १४ कोटी ३४ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याअंतर्गत सध्या पाच प्रमुख पर्यटनस्थळांवर प्रत्यक्ष विकासकामे सुरू आहेत, असे माहिती पुरातत्त्व विभागाच्या सहायक संचालिका जया वाहणे यांनी दिली.
फोटो क्रमांक ःOSM26B07031
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.