छत्रपती संभाजीनगर

धाराशिवमध्ये कडकडीत बंद

CD
फोटो क्रमांक- OSM26B06900 ............ धाराशिव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद महामार्गावर रास्ता रोको, वाहनांच्या लांबच लांब रांगा धाराशिव, ता. ३ (बातमीदार) : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या धाराशिव जिल्हा बंदला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारी (ता. तीन) शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, सकाळी साडेअकराच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर काही काळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच शासनाकडून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. धाराशिव शहरातील बंदला व्यापाऱ्यांनीही प्रतिसाद दिला. सकाळपासून बहुतांश दुकाने बंद ठेवण्यात आली. व्यापारी महासंघानेही बंदला पाठिंबा देत दुपारी दोनपर्यंत व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. सकाळी दहाच्या सुमारास काही कार्यकर्त्यांनी शहरातून फिरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. बंदमुळे शहरातील बहुतांश शाळाही बंद ठेवण्यात आल्या. मुख्य बाजारपेठ, राजमाता जिजाऊ चौक, बसस्थानक परिसरासह विविध भागांतील दुकाने बंद होती. अत्यावश्यक सेवा आणि बससेवा मात्र सुरळीत सुरू होती. महामार्गावरील रास्ता रोको आंदोलन सुमारे तासभर सुरू होते. शासनाने मागण्यांची तातडीने दखल घेऊन तोडगा काढावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापटांना मारहाण, पंडितना अटक! मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पुण्यासारख्या ठिकाणी...

Elina Svitolina Interview : युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाचे पतीसोबत ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न! न्यूयॉर्कमधील अनुभवाबद्दल मारल्या गप्पा

Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांना २४ तास पोलिस सुरक्षा; पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी स्पष्ट शब्दांत खडसावलं

बॅडमिंटन खेळताना क्षुल्लक वाद, ११ वर्षांच्या मुलानं खिशातून चाकू काढला; ९ वर्षीय मुलाचा मृत्यू, घटना CCTVत कैद

Janmashtami Kids Dress Up: मुलांना राधा अन् कृष्णाचा लुक द्यायचायं? घरच्या घरी चिमुकल्यांना 'असे' द्या गोंडस रूप!

SCROLL FOR NEXT