छत्रपती संभाजीनगर

भाव खाणाऱ्या फुलांवर गणेशभक्तांची भक्ती भारी

CD
भाव खाणाऱ्या फुलांवर भारी गणेशभक्तांची ‘भक्ती’ धाराशिवच्या बाजारपेठेत नैसर्गिक, कृत्रिम फुले हार खरेदीसाठी उत्साह सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. १४ ः गणरायाचा जयघोष करीत आणि चैतन्यमयी वातावरणात लाडक्या गणेशमूर्तींचे घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये अत्यंत भक्तिभावाने आगमन झाले आहे. स्वागत आणि पूजनासाठी धाराशिव शहरात गणेशभक्तांचा आणि सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांचा ओसंडून वाहणारा उत्साह पाहायला मिळाला. गणरायाच्या आगमनानिमित्त शहरातील मुख्य बाजारपेठेत फुले आणि हारांना मोठी मागणी राहिली. भाव वधारलेले असतानाही गणरायाच्या स्वागतात कोणतीही कसर राहू नये म्हणून भक्तांनी आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या आनंदाने व उत्साहाने फुलांची खरेदी केली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, बार्शी नाका आणि मुख्य बाजारपेठ परिसरात सकाळपासूनच फुलांच्या स्टॉल्सवर नागरिकांची लगबग दिसून आली. पूजेसाठी लागणारी ताजी सुटी फुले, दुर्वा आणि आकर्षक हारांना ग्राहकांकडून मोठी मागणी राहिली. परराज्यातून आवक जिल्ह्यातून होणारी फुलांची आवक यंदा कमी असली, तरी धाराशिवच्या व्यापाऱ्यांनी कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या शेजारील राज्यांतून मोठ्या प्रमाणावर उत्तम दर्जाची फुले मागवून बाजारात उपलब्ध करून दिली. दूरवरून आलेली ही ताजी आणि रंगीबेरंगी फुले गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत होती. मागणी जास्त आणि आवक परराज्यातून असल्याने फुलांना चांगला भाव मिळाला. ....... ((चौकट)) सजावटीसाठी कृत्रिम फुलांच्या हारांचा ट्रेंड यंदाच्या गणेशोत्सवात नैसर्गिक फुलांसोबतच बाजारात दाखल झालेल्या कृत्रिम फुलांच्या आकर्षक हारांना गणेशभक्तांनी मोठी पसंती दिली आहे. मखर सजावट अधिक आकर्षक करण्यासाठी, तसेच येत्या काही दिवसांत होणाऱ्या गौरींच्या आगमनावेळी त्यांच्या समोरील आरास अधिक देखणी करण्यासाठी नागरिक या टिकाऊ आणि सुंदर कृत्रिम हारांची उत्साहाने खरेदी करताना दिसत आहेत. ........ ((कोट)) झेंडू ८० ते १०० रुपये प्रतिकिलो, गुलाब ३०० ते ३५०, शेवंती ३५० ते ५०० रुपये किलोने विक्री होत आहे. जिल्ह्यातून आवकच नाही. पाणी नसल्याने जिल्ह्यात फुलेच नाहीत. मी बंगळूरहूनन फुले मागविली आहेत. त्यामुळे दर जादा आहेत. मात्र, मागणी कमी झालेली नाही. जादा दर असले तरी नागरिकांकडून फुले खरेदीस मोठी पसंती मिळत आहे. - सुशेन गोरे, फुले विक्रेते, धाराशिव ........ धाराशिव ः विविधरंगी फुलांच्या हारांनी सजलेले बाजारपेठेतील एक दुकान. फोटो क्रमांक ः OSM26B06985

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT