छत्रपती संभाजीनगर

धाराशिवकरांचा `जीव` रस्त्यावर

CD
((एक मेन)) ......... धाराशिवकरांचा ‘जीव’ रस्त्यावर सणासुदीच्या काळात जीव मुठीत धरून प्रवास; ‘राइट टू वॉक’चा फज्जा ................... ((पॉइंटर)) - मोजक्या पदपथांवर ‘ताबा’ अन् रस्त्यावर ही ‘अडचण’ - नगरपालिकेच्या उदासीनतेमुळे पादचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात अविनाश पोफळे ः सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. ८ ः नवरात्र महोत्सव, दसरा, दिवाळी आदी सणासुदीचे दिवस जवळ आल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध रस्त्यांवर खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, या वातावरणात शहरातील रस्त्यांवर चालणे म्हणजे कसरतच ठरत आहे. एकतर बहुतांश रस्त्यांना पदपथच नाही आणि एखाद-दुसऱ्या ठिकाणी उरलेले पदपथ अतिक्रमणाच्या विळख्यात गायब झाले आहेत. त्यामुळे ‘राइट टू वॉक’ या संकल्पनेचा धाराशिव शहरात पुरता फज्जा उडाला असून, नगरपालिकेच्या नाकर्तेपणामुळे धाराशिवकरांचा जीव रस्त्यावर आला आहे. मुख्य बाजारपेठेत पदपथ ओलांडून रस्त्यावरही अतिक्रमणे शहरातील नेहरू चौक ते पोस्ट ऑफिस या बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर नागरिकांना चालायला सुद्धा जागा अपुरी पडू लागली आहे. दोन्ही बाजूंचे पदपथ व्यावसायिकांनी अतिक्रमण करून गिळंकृत करून टाकले आहेत. याशिवाय पदपथ ओलांडून रस्त्यावर देखील अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे उरलेल्या अरुंद रस्त्याच्या मधोमध येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांतून मार्ग काढण्याशिवाय नागरिकांसमोर दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. अपघातापासून बचाव करण्यासाठी डोळ्यांत तेल घालून रस्त्यांवरून चालण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. .......... चौकातील पदपथांवर हातगाडे तुळजापूर नाका ते तेरणा काॅलेज दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर पदपथांचा अभाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगरपालिकेपर्यंत बांधलेल्या पदपथाची अवस्था मरनासन्न झाली आहे. या उरल्यासुरल्या पदपथांवर हातगाड्यांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे नागरिक, प्रवासी, विद्यार्थ्यांना मुख्य रस्त्यावरूनच ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढलेला आहे. ....... नगरपालिकेने नागरिकांना सोडले वाऱ्यावर याशिवाय बार्शी नाका ते सेंट्रल बिल्डिंग, तसेच शहरातील इतर अंतरर्गत रस्त्यांवर पदपथच बांधण्यात आलेले नाहीत. नवीन रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यावर देखील पदपथ बांधण्यात येत नसल्याची गंभीर स्थिती आहे. त्यामुळे नगरपालिकेला नागरिकांच्या राईट टू वाॅकचे काहीही देणेघेणे नसल्याचे चित्र दिसून येत आहे. दुकानदारांनी आपले सामान मांडून रस्त्यांवर ताबा मिळवला आहे. उरलेल्या जागेवर भाजी विक्रेते आणि हातगाडीवाल्यांची गर्दी असते. सार्वजनिक रस्ते व्यावसायिक वापराचे केंद्र बनले आहेत. ........ नगरपालिका आणि वाहतूक पोलिस कधी जागे होणार? सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेऊन नगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवणे गरजेचे होते. मात्र, या दोन्ही प्रशासकीय यंत्रणांकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. प्रशासनाच्या या ढिम्म कारभारामुळे व्यापारी मोकाट आणि नागरिक हवालदिल अशी स्थिती आहे. ......... ((कोट)) दूरदृष्टी आणि नागरिकांच्या अधिकारांची कदर असलेल्या जागरूक प्रशासन, लोकप्रतिनिधींची शहराला गरज आहे. ही दृष्टीहिनता ही खरी शहराची समस्या आहे. त्यामुळे नागरिकांचे अधिकार वैगरेचे कोणालाही काही देणेघेणे पडलेले नाही. खुर्ची, पद हे केवळ मिरविण्यासाठी असते असाच बहुतेकांचा समज झालेला आहे. त्यामुळे पदपथ हा विषय कोणाच्या गावीही नाही. परिणामी, नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावर चालावे लागते. - प्रा. भालचंद्र हुच्चे, ज्येष्ठ नागरिक, गवळी गल्ली, धाराशिव ........ नगरोत्थानअंतर्गत शहरात होत असलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर त्याठिकाणी पदपथ आणि वृक्षलागवड करण्यात येणार आहे. तसेच नुकतीच तीन दिवस अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. येत्या काही दिवसांत पुन्हा अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात येईल. - नीता अंधारे, मुख्याधिकारी, नगरपालिका, धाराशिव ........ धाराशिव ः शहरातील नेहरू चौक ते पोस्ट ऑफिस दरम्यानच्या मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर पदपथ नसल्याने आणि रस्त्यावर अतिक्रमणे झाल्याने नागरिक, विद्यार्थ्यांना असे रस्त्यावरून चालावे लागत आहे. फोटो क्रमांक ःOSM26B07142 ...... धाराशिव ः छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगरपालिकेपर्यंतच्या पदपथावर हातगाडीचालकांनी केलेले अतिक्रमण. फोटो क्रमांक ःOSM26B07143 ....... धाराशिव ः ताजमहल टाॅकीजजवळील नवीन रस्त्याचे काम सुरू असून या ठिकाणी पदपथाचे काम होत नसल्याची स्थिती आहे. फोटो क्रमांक ःOSM26B07144

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patekar Death : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे Cardiac Arrest ने निधन; हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टमध्ये काय फरक असतो? शरीरात नेमकं काय घडतं?

'या' लोकांपासून वेळीच दूर राहा! चाणक्य नीतीत सांगितले आहेत वाईट काळाचे संकेत

Mulund Fire: मुलुंडमध्ये बांधकाम साइटवर मोठा स्फोट, आगीचा भडका, परिसरात धुराचे लोट; Video Viral

Latest Marathi News Live Update: पुण्यात अतिक्रमण निरीक्षकाला लाथ मारून मारहाण

काँग्रेस कार्यकर्त्यांनी मला मारलं, मी मोदी समर्थक; काश्मिरी मुस्लीम तरुणाचा आरोप, दिल्लीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT