छत्रपती संभाजीनगर

दिवाळीत तरी धाराशिवमधील रस्ते प्रकाशमान होणार का?

CD
दिवाळीत तरी उजळणार का धाराशिवचे रस्ते? १२ हजारपैकी शेकडो पथदिव्यांखाली ‘अंधार’; शंभरहून अधिक तक्रारी ........ सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. ३० : शहरातील रस्त्यांवरील शेकडो पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रस्त्यांवर रात्री अंधारात ये-जा करताना नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते. दिवाळीपूर्वी नवीन दिवे बसवून रस्त्यांना प्रकाशमान करणार का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. शहरातील विविध भागांत मिळून सुमारे १२ हजार पथदिवे आहेत. मात्र, त्यातील अनेक महत्त्वाच्या भागांतील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. विशेष म्हणजे, नगरपालिकेकडे नवीन दिव्यांचा साठाच शिल्लक नसल्याने बंद पडलेले पथदिवे बदलण्यात येत नसल्याची स्थिती आहे. नागरिकांच्या तक्रारी थांबेना शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये आणि मुख्य रस्त्यांवर सायंकाळ होताच अंधार पसरत आहे. त्यामुळे नागरिक रोज नगरपालिकेच्या पायऱ्या चढून तक्रारी करत आहेत. आमच्या भागातील पथदिवा बंद पडला आहे. नवीन दिवा बसवून द्या, अशा आतापर्यंत नगरपालिकेच्या विद्युत विभागाकडे शंभरपेक्षा अधिक अधिकृत तक्रारी दाखल झाल्या आहेत. अंधारामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नसून लहान-मोठे अपघात घडण्याची भीती आहे. सणासुदीच्या दिवसांत नागरिकांची घरे दिव्यांनी उजळणार असली तरी शहरातील अनेक रस्ते मात्र अंधारातच राहणार असल्याची स्थिती आहे. ......... ((कोट)) दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. घरात आम्ही दिवे लावून सण साजरा करू, पण बाहेर नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे मुख्य रस्त्यांवर मात्र काळोख पसरत आहे. दिव्यांची देखभाल दुरुस्ती, बंद पडलेले दिवे तत्काळ काढून त्याठिकाणी नवीन दिवे बसविण्याची कार्यवाही तत्परतेने का होत नाही, हा प्रश्न आहे. नगरपालिका नागरिकांच्या तक्रारींची वाट का बघत बसते? - संतोष जगताप, नागरिक, धाराशिव .......... ((कोट)) तेरणा काॅलेज ते आयुर्वेदिक काॅलेजपर्यंतचा मुख्य रस्ता, तसेच शहरातील अंतर्गत भागातील रस्त्यांवर एखाद्या ठिकाणी दिवा चालू तर चार ठिकाणी बंद अशी स्थिती आहे. त्यामुळे अपघाताची तसेच रात्री चोऱ्या होण्याची भीती आहे. दिवाळीत तरी सर्व ठिकाणचे दिवे सुरू राहावेत. त्यासाठी नगरपालिकेने तत्काळ दिवे बसवून घ्यावेत. - तुषार निंबाळकर, गवळी गल्ली, धाराशिव ......... ((कोट)) दिवे बंद पडल्याच्या नागरिकांच्या तक्रारी सुरूच असतात. बंद दिवे दुरुस्त करून दिले जातात. सध्या दिव्यांचा स्टाॅक नाही. मागील चार ते पाच महिन्यांत ८०० पेक्षा अधिक दिवे बसविले आहेत. - सिद्धार्थ मोरे, विद्युत अभियंता, नगरपालिका, धाराशिव ........ ((पाँईंटर)) प्रमुख समस्या एका नजरेत - शहरातील एकूण पथदिवे : सुमारे १२ हजार - सध्याची स्थिती : अनेक भागांतील पथदिवे बंद - नगरपालिकेकडे तक्रारी : शंभरपेक्षा अधिक - मुख्य अडचण : पालिकेकडे नवीन पथदिव्यांचा तुटवडा - परिणाम : अपघातांची भीती आणि रात्री रस्ते अंधारात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाल्कनीत फुले तोडायला गेला, अचानक पाय घसरून...; बापलेकाचा 23 व्या मजल्यावरून पडून करुण अंत

What Hardik Pandya do now? रोहितच्या नेतृत्वाखाली हार्दिक Mumbai Indians कडून खेळणार का? ऑलराऊंडर काय म्हणाला ते वाचा

Gold-Silver Investment: सोनं की चांदी? 1:76 च्या रेशोमुळे कशात गुंतवणुकीची संधी? तज्ज्ञांनी सांगितला फॉर्म्युला!

Marathi News Live Updates : दुष्काळग्रस्तांसाठी सरकारचा दिलासा; सुका चारा आणि मुरघासाचे दर निश्चित

Pune Accident News: पुणे-सोलापूर महामार्गावर मातीचा ढिगारा कोसळून एक मजूर ठार, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT