छत्रपती संभाजीनगर

धाराशिवचे ग्रामदैवत ''धारासुर मर्दिनी''

CD
धारासुरमर्दिनी मंदिरात घटस्थापना ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला धाराशिव, ता. ११ : आदिशक्तीच्या भक्तीचा आणि चैतन्याचा उत्सव असलेल्या नवरात्रोत्सवाला रविवारी (ता.११) उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. शहराचे श्रद्धास्थान व ग्रामदैवत असलेल्या श्री धारासुरमर्दिनी देवी मंदिरात नगराध्यक्षा नेहा काकडे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. पहिल्याच दिवशी ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. घटस्थापनेच्या मुहूर्तावर धारासुरमर्दिनी देवीची षोड्शोपचार पूजा करण्यात आली. देवीच्या आशीर्वादाने नागरिकांच्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य आणि भरभराट नांदो, शहराची निरंतर प्रगती होऊन शांतता व सौहार्द टिकून राहो, अशी प्रार्थना नेहा काकडे यांनी देवीचरणी केली. दरम्यान, धारासुरमर्दिनी देवीचे मंदिर पुरातन असून, येथे दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गेल्या काही वर्षांत मंदिराचा भव्य जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराचा नूतन गाभारा, उंच व देखणा कळस, मंदिरासमोरील भव्य मंडप आणि दर्शनी भागातील दोन दीपमाळांमुळे मंदिराच्या वैभवात भर पडली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, रात्रीच्या वेळी मंदिर उजळून निघत आहे. नवरात्रोत्सवाच्या दहा दिवसांत मंदिरात दररोज आराधी मंडळाची गाणी, भजन, कीर्तन आणि प्रवचन असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. ----- धाराशिव : श्री धारासुरमर्दिनी देवी मंदिरात घटस्थापना करण्यात आली. (दुसऱ्या छायाचित्रात) आकर्षक विद्युत रोषणाईने उजळलेले मंदिर. OSM26B07170, OSM26B07171

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

Chhatrapati Sambhajinagar Accident: खड्डा चुकविताना ट्रॅक्टर उलटला; ३९ वर्षीय शेतकऱ्याचा चाकाखाली आल्याने मृत्यू, महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT