छत्रपती संभाजीनगर

कचरा डेपोविरोधात पोस्टरवर व्यक्त झाला धाराशिवकरांचा संताप

CD
पोस्टरवर व्यक्त झाला धाराशिवकरांचा संताप कचरा डेपोसह नागरी समस्यांविरोधात काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. १७ : शहरातील कचरा डेपो शहराबाहेर हलविणे, नियमित स्वच्छता आणि तुंबलेल्या नाल्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारपासून (ता. १७) तीन दिवसीय स्वाक्षरी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वाक्षरीसोबतच शहरातील अस्वच्छता आणि नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभाराविरोधातील संताप थेट पोस्टरवर लिहून व्यक्त केला. शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त राहावे या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि गणेश नगर परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुणांनी स्वतःहून पुढाकार घेत आपापल्या भागातील समस्या मांडल्या. आम्ही नियमितपणे कर भरतो, त्यामुळे स्वच्छता, पाणीपुरवठा आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधा देणे ही नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे, अशी संतप्त भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त केली. केवळ कर वसुलीवर भर न देता प्रशासनाने तातडीने नागरी सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मोहिमेत काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेशराजे निंबाळकर यांच्यासह प्रशांत पाटील, धनंजय राऊत, खलील सय्यद, अग्निवेश शिंदे, अभिमान पेठे, अंकुश पेठे, अजहर पठाण, गोरोबा झेंडे, प्रभाकर लोंढे, अशोक बनसोडे, जयसिंग पवार, ॲड. गणपत कांबळे, हरिदास शिंदे, ॲड. राजूदास आडे, अविनाश रणखांब आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ........ धाराशिव ः नागरी समस्यांबाबत शहरात राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत मंगळवारी पहिल्या दिवशी स्वाक्षरी करताना नागरिक. फोटो क्रमांक ः OSM26B07411

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Election: उत्तर प्रदेशात काँग्रेसला हव्यात १०० हून अधिक जागा, नाराज अखिलेश किती जागा देणार?

Trump Modi Quad meeting: कणखर व्यक्तिमत्व! क्वाड नेत्यांच्या बैठकीत ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक

FDA अधिकारी बनून पानटपरीवर धाड, बोगस अधिकाऱ्यांचा पर्दाफाश, ६ जणांना अटक; २.६६ लाखांची रोकड जप्त

Dhoni Retirement: "तू आमचा थाला अन् कर्णधार नेहमीसाठीच राहशील...", ऋतुराज गायकवाडची धोनीसाठी भावूक पोस्ट

१३ वर्षांचा वनवास संपला! नागपुरात रंगणार महाराष्ट्र केसरीचा महासंग्राम; १३०० मल्ल दाखवणार कुस्तीचा दम, 'या' तारखेला आयोजन

SCROLL FOR NEXT