छत्रपती संभाजीनगर

धाराशिवचा अग्निशमन विभागच ‘आयसीयूमध्ये’

CD
धाराशिवचा अग्निशमन विभागच ‘आयसीयूमध्ये’ - हक्काचा एकही बंब नाही, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव - कंत्राटी कर्मचाऱ्यांवरच आग विझविण्याची जबाबदारी - अपुऱ्या संसाधनांवर आग शमविताना दमछाक; प्रस्ताव धूळखात सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. १४ ः उन्हाळा असो वा पावसाळा, शहरात कोणतीही आणीबाणीची किंवा आगीची दुर्घटना घडल्यास नागरिकांच्या रक्षणासाठी धावून जाणारा अग्निशमन विभाग स्वतःच सध्या आयसीयूमध्ये आहे. शहरातील अग्निशमन विभागाची दुरवस्था पाहता धाराशिव शहराची सुरक्षा सध्या पूर्णपणे ‘राम भरोसे’ असून, अपुरी उपकरणे, बंब आणि मनुष्यबळाच्या समस्येने अग्निशमन विभागाला घेरले असून आवश्यक साधनांची मागणी करणारा प्रस्ताव गेल्या कित्येक महिन्यांपासून शासनदरबारी धूळखात पडला आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत वाचविण्यासाठी नागरिकांना कोणीही वाली नसल्याची विदारक स्थिती आहे. गरज चार बंबांची, गुजराण दोनवर अग्निशमन विभागाची अवस्था एवढी बिकट आहे की, विभागाकडे एक लहान रेस्क्यू वाहन वगळता एकही हक्काचा बंब नाही. उमरगा येथून मागविलेला एक बंब आणि नुकताच एका कंपनीकडून मिळालेला एक बंब, अशी दोनच वाहने उपलब्ध आहेत. त्यावरच काम भागवले जात आहे. ना फायर ऑफिसर, ना फायरमन एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या या शहरात अग्निशमन विभागाला सांभाळण्यासाठी पूर्ण वेळ फायर ऑफिसर, फायरमन नाही. संपूर्ण विभागाचा डोलारा केवळ कंत्राटी पद्धतीवर घेतलेल्या १२ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. पुरेसे प्रशिक्षण आणि अत्याधुनिक साधनांअभावी या कर्मचाऱ्यांचा जीवही धोक्यात येण्याची भीती आहे. एका शिफ्टमध्ये सहा असे तीन शिफ्टमध्ये १८ आणि दोन इतर अशा २० कर्मचाऱ्यांची नितांत गरज आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दोन फायर स्टेशनची गरज शहरातील वाढलेली लोकसंख्या आणि तालुक्याची जबाबदारी पाहता शहरात दोन फायर स्टेशन आणि तालुक्यातील येडशी, बेंबळी भागात प्रत्येकी एका स्टेशनची गरज आहे. मात्र, सद्यःस्थितीला कार्यरत असलेले एक स्टेशनही धड नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे आग लागल्यानंतर वेळेत पोहचण्याला मर्यादा येत आहेत. मोठी जीवितहानीची भीती शहर तसेच तालुक्यातील बहुतांश हॉस्पिटल्स, मोठी हॉटेल्स, व्यावसायिक कॉम्प्लेक्स आणि धोकादायक इमारतींचे गेल्या कित्येक दिवसांत कोणतेही फायर ऑडिट झालेले नाही. संभाव्य आग लागण्याची शेकडो ठिकाणे शहरात असूनही प्रशासन हातावर हात ठेवून बसले आहे. येडशीसारखी एखादी मोठी आगीची दुर्घटना धाराशिवमध्ये घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत शहरात मोठी जीवित आणि वित्तहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष जिवावर प्रशिक्षित मनुष्यबळ आणि नवीन बंब येईल तेव्हा येईल, पण तोपर्यंत आणखी नागरिकांची जीव जाण्याची वाट प्रशासन पाहणार आहे का? शेजारच्या तालुक्यातून गाडी येईपर्यंत आगीत सर्वकाही भस्मसात झालेले असेल, याचे भान मुख्याधिकारी आणि लोकप्रतिनिधींना का नाही, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. .......... ((कोट)) ब्रेथिंग एअर सेट अर्थात उत्तम प्रशिक्षण असलेला एकही कर्मचारी नाही. एसएफटी म्हणजेच सहा महिन्यांचे प्राथमिक स्तरावरील प्रशिक्षण घेतलेले कंत्राटी कर्मचारी आहेत. फायर ऑफिसर, फायरमन नाही. पुरेसे बंब नाहीत. अशा स्थितीतही आम्ही रविवारपासून (ता. आठ०) शनिवारपर्यंत (ता. १४) १९ ठिकाणी आगी विझविल्या आहेत. - संभाजी साळुंके, प्रभारी इन्चार्ज, अग्निशमन विभाग, धाराशिव ....... ((कोट)) शासनाकडे २०२५ मध्येच प्रस्ताव सादर केलेला आहे. चार वाहनांची मागणी केलेली आहे. विभागातील अधिकाऱ्यांच्या पाच जागा रिक्त आहेत. त्याही भरलेल्या नाहीत. भरतीच झालेली नाही. तात्पुरता हायटेक कंपनीने एक बंब दिलेला आहे. - अभिजित गोरे, उपमुख्याधिकारी, नगरपालिका, धाराशिव ................ धाराशिव ः दोन दिवसांपूर्वी एका गादी दुकानात लागलेली आग आटोक्यात आणताना अग्निशमन विभागाचे कर्मचारी. फोटो क्रमांक ः OSM26B07386

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime News : पैशांच्या वादातून रक्ताचा सडा! साडूनेच साडूचा केला निर्घृण खून अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; मिरज तालुक्यात खळबळ!

'संजय दत्तच्या केससाठी बाळासाहेबांनी मातोश्रीवर बोलावलं अन्...' उज्ज्वल निकम यांनी सांगितला किस्सा, म्हणाले...

Jellyfish in Anjarle Sea Beach : आंजर्ले समुद्रकिनारी जेलीफिशचा वावर वाढला; समुद्रात अंघोळ करताना १४ वर्षीय मुलीला स्पर्श, त्वचेवर खाज, जळजळ

Latest Marathi News Live Update: रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीमध्ये वाद मिटेना, नेमकं काय घडतंय?

PM Modi: पंतप्रधान मोदींकडे डीके शिवकुमारांनी केली 'ही' मागणी; काँग्रेसमधूनच कडाडून विरोध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT