छत्रपती संभाजीनगर

सात टक्केच उपयुक्त पाणीसाठा

CD
(पान एकवर दुष्काळाच्या बातमीच्या बाजूला) सव्वादोनशे प्रकल्पांमध्य केवळ सात टक्के पाणीसाठा शिल्लक! जिल्ह्यातील ४७ प्रकल्प कोरडे; भूगर्भपातळी थेट ७ मीटरने खाली धाराशिव, ता. १९ : यंदाच्या पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे धाराशिव जिल्ह्यावर तीव्र पाणीसंकटाचे ढग दाटले आहेत. पावसाळ्याचे दिवस असतानाही जिल्ह्यातील लघू, मध्यम व मोठ्या प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ होण्याऐवजी दिवसेंदिवस मोठी घट होत आहे. जिल्ह्यातील एकूण २२५ प्रकल्पांमध्ये सध्या केवळ ७.३५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामात सुरवातीपासूनच जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत नगण्य राहिले आहे. प्रकल्पांतील पाणीसाठा किंवा भूगर्भातील पाणीपातळी वाढेल, असा एकही जोरदार पाऊस जिल्ह्यात झाला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ५२.४ टक्के वार्षिक सरासरी पावसाची नोंद झाली आहे. पावसाळा आता अंतिम टप्प्यात आला असून, जलसाठ्यांमध्ये पाणीच न आल्यामुळे प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. प्रकल्पांची सद्यःस्थिती : एकूण प्रकल्प : २२५ (१ मोठा, १७ मध्यम आणि २०७ लघु प्रकल्प) कोरडे पडलेले प्रकल्प : ४७ जोत्याखालील साठा : १०४ प्रकल्प २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा : ६० प्रकल्प भूगर्भातील पाणीपातळीत मोठी घट नेहमीच्या काळात पावसाळ्यानंतर भूगर्भातील पाणीपातळी साधारणपणे दोन ते तीन मीटरने खाली जाते. मात्र, यंदा पुरेसा पाऊस न झाल्यामुळे ही पातळी थेट सात मीटरने खाली गेली आहे. भूजलाचा उपसा वाढल्याने आणि फेरभरण (रिचार्ज) न झाल्याने जिल्ह्यातील कूपनलिका व विहिरींनी आधीच तळ गाठला आहे. प्रशासकीय हालचाली आणि टंचाई आराखडा वाढत्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यातील सहा गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तसेच, टंचाईग्रस्त भागातील नागरिकांची सोय व्हावी यासाठी प्रशासनाने १८४ विहिरी आणि कूपनलिकांचे अधिग्रहण केले आहे. आगामी काळात टँकर भरण्यासाठीदेखील नवीन जलस्रोतांचा शोध घ्यावा लागण्याची चिन्हे आहेत. पावसाचा उर्वरित काळ आणि आगामी उन्हाळा डोळ्यांसमोर ठेवून, संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाकडून जुलै २०२७ पर्यंतचा टंचाई आराखडा तयार करण्याचे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्यातील ही बिकट परिस्थिती पाहता, आगामी काळात टँकरची मागणी करणाऱ्या गावांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: ससूनमधून परतले, जेवणासाठी महामार्गावर उतरले; काही क्षणांतच सहाय्यक फौजदारावर काळाचा घाला, अज्ञात वाहनाची धडक अन्..

Latest Marathi News Update : शिरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत; झोपडीत झोपलेल्या महिलेवर हल्ला

मामा-भाच्यात असं काय घडलं? राजगुरूनगरमध्ये धक्कादायक घटना |

Rohit Sharma: वडापाव नाही, तर टेन्शनच्या वेळी आईच्या हातचा 'हा' पदार्थ आहे कम्फर्ट फूड; रोहितने केला खुलासा

Satara Accident News: ४६ दिवस मृत्यूशी झुंज; बंगळूर महामार्गावरील अपघातात गंभीर जखमी प्रतीक काळभोरचा अखेर मृत्यू, एकुलता एक मुलगा गमावला

SCROLL FOR NEXT