छत्रपती संभाजीनगर

अनुदानाचे पैसे काढण्यासाठी बँकेत झुंबड

CD
ABD26J82654 धावडा ः येथील बॅंकेत पैसे काढण्यासाठी लाभार्थींची झालेली गर्दी. .............. अनुदानाचे पैसे काढण्यासाठी बँकेत झुंबड लाभार्थींची गर्दी वाढली; धावडा जिल्हा बँकेच्या शाखेत कर्मचाऱ्यांची कमतरता धावडा, ता. ३ : भोकरदन तालुक्यातील धावडा मंडळातील भोरखेडा, पोखरी, मेहगाव, वडाळी, विझोरा, वाढोणा, जाळीचा देव, अडगाव आणि धावडा येथील शेतकऱ्यांना दुष्काळी सानुग्रह अनुदान, पीएम किसान, लाडकी बहीण, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ आदी शासकीय योजनांचे पैसे दिवाळीच्या मुहूर्तावर बँक खात्यात जमा होत आहेत. त्यामुळे बँक ऑफ महाराष्ट्र आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या धावडा शाखेत पैसे काढण्यासाठी लाभार्थींची मोठी गर्दी होत आहे. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा पीककर्ज मिळण्याच्या आशेने कर्ज प्रकरणांच्या फाइलवर सह्या करण्यासाठीही बँकेत यावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी तसेच विविध शासकीय योजनांचे लाभार्थी महिला व पुरुषांची गर्दी वाढली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत एकाच कर्मचाऱ्यावर सर्व कामांचा भार असल्याने लाभार्थींना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धावडा शाखेत किमान आणखी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. दरम्यान, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पीएम किसान आणि दुष्काळी सानुग्रह अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे पैसे मिळण्याच्या अपेक्षेने बँकेत आलेल्या या शेतकऱ्यांचा हिरमोड होत असून, त्यांना निराश होऊन रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Fort: शिवप्रेमी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! रायगडाची सफर आता चार मिनिटांत, दीड महिन्यानंतर रोपवे पुन्हा सुरू

Satara Bank Election: ४४-४४ मतांचा पेच अन् ईश्वर चिठ्ठीचा कौल; सातारा जिल्हा बँकेत सुनील माने विजयी, कोरेगावात राष्ट्रवादीची मते फुटली?

Crime News: भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, जागेवरच मृत्यू; शिंदेसेनेच्या नेत्यानं कट रचल्याचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

शुक्राची वक्री चाल ५ राशींचं टेन्शन वाढवणार, पुढील १२ दिवस अनावश्यक खर्च टाळा, अन्यथा...

Satana Bribery Case: वडिलांच्या मालमत्तेवर वारस नोंद करण्यासाठीही लाच! सटाण्यातील सरकारी अधिकारी एसीबीच्या ताब्यात, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT