संग्रहित छायाचित्र 
छत्रपती संभाजीनगर

दुधाळ जनावरांचा निधीही कोरोनाने खाल्ला!

मधुकर कांबळे

औरंगाबाद -  शेतीला दुग्धोत्पादनाची जोड मिळावी म्हणून जिल्हा परिषदेकडून विशेष घटक योजनेतून दुधाळ गायी, म्हशींचे वाटप केले जाते. गेल्या वर्षातील लाभार्थ्यांची निवड होऊन तालुक्यांना निधीही पोचला मात्र कोरोनामुळे जनावरांचे बाजारच बंद असल्याने निवड झालेल्या लाभार्थ्यांना दूध-दुभत्यासाठी बाजार सुरू होण्याची वाट पाहावी लागणार आहे. तर चालू आर्थिक वर्षात कोरोनामुळे या योजनेसाठी केवळ ३३ टक्केच निधी उपलब्ध झाल्याने यंदा कमी लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे. 

अशी आहे योजना 
विशेष घटक योजनेतून ७५ टक्के अनुदानावर पशुसंवर्धन विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील गरजूंना दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात येते. यामध्ये दोन गायी किंवा म्हशी दिल्या जातात. या योजनेमुळे गरजूंना मोठा आर्थिक आधार मिळतो. यातून महिलांचे सक्षमीकरण होण्यासही मदत होत आहे. त्यामुळे ही योजना महत्त्वाची आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आणि पंचायत समित्यांकडे निधीही वर्ग करण्यात आला; परंतु कोरोना महामारीमुळे जनावरांचे बाजार भरवण्यावर आलेल्या निर्बंधामुळे दुधाळ जनावरांची खरेदी होऊ शकली नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. परिणामी लाभार्थ्यांना आता वाटच पाहावी लागणार आहे. 

लाभार्थी होणार कमी 
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून २०२०-२१ या वर्षाचे लाभ देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. ३० जुलैपर्यंत पंचायत समितीस्तरावर अर्ज मागवण्यात आले आहेत; मात्र कोरोना महामारीमुळे चार मे २०२० रोजी शासनाने ३३ टक्क्यांच्या आधीन राहूनच निधी योजना राबवण्याचे निर्देश दिलेले आहेत. यामुळे यंदा केवळ ३३ टक्केच निधी या योजनेसाठी लाभ मिळणार आहे. परिणामी लाभार्थीसंख्या यावर्षी कमी होणार आहे. प्रति लाभार्थी दोन दुधाळ जनावरे आणि त्यांचा तीन वर्षांसाठीचा विमा असा ८५ हजार ६१ रुपयांचा खर्च केला जाणार असून, ३९ लाभार्थ्यांची निवड केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. कोरोनामुळे यंदा विविध विकासकामांना फटका बसलेला आहे. यातील ही एक योजना आहे. 
संपादन ः प्रवीण मुके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaydatta Kshirsagar : मुख्यमंत्री फडणवीसांच्या 'Welcome'साठी जयदत्त क्षीरसागर हेलिपॅडवर हजर, पण सभेला मात्र गैरहजर!

जितकी सुंदर तितकीच निर्दयी! 8.5 IMDb रेटिंगवाली ती कोरियन सीरिज जी तुम्हाला चांगलं-वाईटमधला फरकही करू देत नाही

IND vs SA, 1st ODI: विराटचा सेलिब्रेशनला नकार, तर रोहितची प्रशिक्षकाशी गंभीर चर्चा; सामन्यानंतरच्या Video ने वाढवले टेन्शन

Mumbai Local: गरम अन् ताजं जेवण मिळणार...! मुंबई ट्रेन प्रवास स्वादिष्ट होणार; रेल्वे केटरिंगचा मोठा मेगा प्लॅन तयार, वाचा...

आतातरी अर्ध्यातून शो सोडू... रितेश देशमुख 'बीबीमराठी६' चं होस्ट करणार समजताच नेटकऱ्यांनी दिले सल्ले; आठवण करून देत म्हणाले-

SCROLL FOR NEXT