दिव्यांग भवनाचा पहिला टप्पा डिसेंबरमध्ये
छत्रपती संभाजीनगर, ता. ११ ः महापालिकेतर्फे हडको एन-१२ भागात दिव्यांग भवनाचे काम हाती घेण्यात आले असून, पहिल्या टप्प्याचे काम जागतिक दिव्यांग दिनापर्यंत म्हणजेच ३ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिले आहेत.
दिव्यांग भवनाच्या कामाची बुधवारी (ता. नऊ) पाहणी केली. दिव्यांग निधीसाठी निधी कमी पडल्यास राज्य-केंद्र शासनाच्या विविध योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात यावेत किंवा सीएसआर फंडातून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करा, असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. त्यासोबतच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या दिव्यांगांना देखील उदरनिर्वाह भत्त्याचा लाभ देण्यात येणार आहे. दिव्यांगांना सर्वसमावेशक लाभ मिळवून देण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. दिव्यांग लाभार्थींना २०२६-२७ मध्ये हयातीबाबत नूतनीकरण अर्ज दाखल न करता प्रत्येक महिन्याच्या ११ ते ३० तारखेपर्यंत ऑनलाइन फेस स्कॅनिंगसाठी सक्षम ॲपवर स्वतंत्र लिंक उपलब्ध करून दिली जात आहे. महापालिकांच्या योजनेपासून दिव्यांग वंचित राहू नयेत यासाठी आशा स्वयंसेविकांमार्फत दिव्यांग व एकल महिलांचा सर्व्हे केला जात आहे. दिव्यांग लाभार्थींचा शिष्यवृत्ती व ३८७ जणांचा लाभ वितरित करण्याचे आदेश अमोल येडगे यांनी दिले.
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.