छत्रपती संभाजीनगर

जिल्हा बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा

CD
जिल्हा बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा --- डिजिटल बँकिंग, ठेवीवाढ व थकीत कर्जाच्या वसुलीवर भर देण्याच्या अशोक चव्हाण यांच्या सूचना --- सकाळ वृत्तसेवा नांदेड, ता. १२ : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक स्थितीचा आणि कामकाजाचा खासदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. ११) आढावा घेतला. बँकेची आर्थिक स्थिती सुधारत असून, आगामी काळात डिजिटल बँकिंगचा विस्तार, ठेवीवाढ आणि थकीत कर्जाच्या वसुलीवर अधिक भर देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. बँकेचे अध्यक्ष आमदार डॉ. तुषार राठोड यांनी अशोक चव्हाण यांचे स्वागत करून सत्कार केला. उपाध्यक्षा डॉ. मीनल पाटील खतगावकर यांनीही त्यांचा सत्कार केला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय कदम यांनी बँकेची आर्थिक स्थिती, प्रमुख अडचणी, सुरू असलेल्या उपाययोजना आणि भविष्यातील कृती आराखड्याची माहिती दिली. बँकेचे नक्तमूल्य उणे ३२५ कोटी रुपयांवरून २९० कोटी रुपयांपर्यंत सुधारले असून, एनपीए ८८ टक्क्यांवरून १४.१८ टक्क्यांवर आला आहे. तसेच सुमारे ३७० कोटी रुपयांचा संचित तोटा भरून काढत बँक निव्वळ नफ्यात आल्याबद्दल अशोक चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले. बँकेची आर्थिक स्थिती आणखी सक्षम करण्यासाठी इतर बँकांच्या धर्तीवर डिजिटल बँकिंगचा विस्तार करावा, ठेवी वाढवाव्यात तसेच एनपीए असलेल्या संस्थांकडून वसुलीसाठी कर्मचारीनिहाय व शाखानिहाय उद्दिष्ट निश्चित करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. ऑडिटमधील त्रुटींची पूर्तता गांभीर्याने करण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचेही त्यांनी सुचविले. बँकेतील अपुऱ्या कर्मचारी संख्येच्या पार्श्वभूमीवर बिंदुनामावली तपासणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून शासनमान्य संस्थेमार्फत पारदर्शक पद्धतीने कर्मचारी भरती करण्याबाबतही चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्ष डॉ. तुषार राठोड यांनी कर्मचारी भरती, नवीन संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर अद्ययावत करणे तसेच ठेवीवाढीसाठी कृती आराखडा तयार करून कर्मचारीनिहाय ठेवीवाढ व कर्जवाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीस आमदार अमरनाथ राजूरकर, संचालक बी.आर. कदम, मारोतराव कवळे, श्रीनिवास चव्हाण, कैलास गोरठेकर, विजयसिंह हनेगावकर, राजेंद्र केशवे, शिवराम लुटे, रामचंद्र मुसळे, मारोतराव जाधव, राजू जाधव, ज्ञानेश्वर दहिफळे, अनिल पाटील बाभळीकर, दत्तात्रय रेड्डी, संगीता पाटील डक, सरव्यवस्थापक प्रशांत महामुने यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखांचे झाले तब्बल 1.35 कोटी! फक्त 6 महिन्यांतच पैसा तिप्पट; पाहा गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर

Ganeshotsav Rules: गणेशोत्सवात नियमभंग करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल; वाघोली पोलिसांचा कडक इशारा

Ayurvedic Remedies for Arthritis: संधिवातामुळे चालणंही कठीण होतंय? मग 'हे' ३ आयुर्वेदिक उपाय देतील सांध्यांना आराम!

Nagpur Crime : जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याकडून कुऱ्हाडीने सुनेचा खून

Oppo Smartphone: 7000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले! 16 सप्टेंबरला लाँच होतोय Oppo चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन! किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT