Aurangabad  sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : जिल्हा रुग्णालयातील लाखोंचे साहित्य भंगारात!

वॉर्डात हे साहित्य असल्याने ते गोदामात हलविण्यात येत आहे

सकाळ वृत्तसेवा

वॉर्डात हे साहित्य असल्याने ते गोदामात हलविण्यात येत आहे

औरंगाबाद : कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात अद्यावत साहित्याच्या माध्यमातून सुविधा देण्यात आली. लाखो रुपये खर्च करुन फर्निचर, पार्टिशनद्वारे स्वतंत्र रूम तयार करण्यात आली होती. कोरोना ओसरताच प्रशासनाने सर्व साहित्य बंद खोलीत कैद केले. आता हेच साहित्य भंगारात टाकण्याचा घाट घातला जात आहे. हे चांगल्या स्थितीतील साहित्य भंगारात टाकण्यात आल्याची माहिती कार्यालयीन अधीक्षक दत्ता श्रृंगारे यांनी दिली.

कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर ते नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय स्तरावर कोट्यवधींची औषधी, यंत्रसामुग्री खरेदी करण्यात आली. रुग्णसंख्या वाढत असल्याने चिकलठाण्यातील जिल्हा रुग्णालयात सुमारे ५७ लाख रुपये खर्चून अ‍ॅल्युमिनियम पार्टिशनद्वारे रुग्णांसाठी रुम तयार करण्यात आल्या.

फर्निचर, बायपॅक मशीनसह अद्यावत यंत्रसामुग्रीची ही बनविण्यात आली. आता कोरोना कमी झआल्याने हे साहित्य काढण्यात आले. ते भंगारात देण्याच्या हालचाली सुरु होत्या. मात्र, बंद खोलीत तिसऱ्या मजल्यावर टाकण्यात आले. हे विक्री केली जाणार असल्याचीही चर्चा सुरु झाली आहे.

साहित्य सुरक्षित

जिल्हा रुग्णालयात विविध वॉर्ड सुरू करावयाचे आहेत. वॉर्डात हे साहित्य असल्याने ते गोदामात हलविण्यात येत आहे. या साहित्याचा भविष्यात वापर करण्यात येईल, असे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ, कार्यालयीन अधिक्षक दत्ता श्रृंगारे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT