छत्रपती संभाजीनगर

दिवाळीत चाकरमान्यांसाठी एसटीची ''लालपरी'' धावणार सुसाट; बीड विभागाकडून लांब पल्ल्याच्या ३६ जादा फेऱ्या

CD
पान १ लीड --- लालपरीच्या तब्बल ३६ जादा फेऱ्यांचे नियोजन दिवाळीत प्रवास होणार सुखकर; गैरसोय टळणार, वेळापत्रक जाहीर सकाळ वृत्तसेवा बीड, ता. २९ ः दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह, प्रकाश आणि आप्तस्वकीयांच्या भेटीचा सण. या सणानिमित्त पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांतून आपल्या गावी, बीडमध्ये परतणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी असते. प्रवाशांची हीच वाढती गर्दी आणि दिवाळीचा उत्साह लक्षात घेऊन एसटी महामंडळाच्या बीड विभागाने प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची एक मोठी आणि सकारात्मक भेट दिली आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि वेळेवर व्हावा यासाठी एसटीच्या लालपरीने कंबर कसली असून, लांब पल्ल्याच्या तब्बल ३६ जादा फेऱ्यांचे अचूक वेळापत्रक जाहीर केले आहे. दुसरीकडे, प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला चाप लावण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कडक पावले उचलली आहेत. सणासुदीच्या काळात एसटी बस ही प्रवाशांसाठी हक्काचे आणि सुरक्षित साधन असते. महिलांना मिळणारी ५० टक्के सवलत, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध शासकीय सवलतींमुळे यंदाही लालपरीला प्रवाशांची मोठी पसंती मिळत आहे. बीड विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या नियोजनानुसार पुणे, मुंबई, कल्याण, धुळे, संभाजीनगर, अमरावती, सोलापूर, नाशिक, लातूर, बारामती, त्र्यंबकेश्वर आणि आदमापूर यांसारख्या प्रमुख मार्गांवर विशेष जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. याशिवाय प्रादेशिक स्तरावरील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी आणि जालना या मराठवाड्यातील मार्गांवरही डझनभर जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना वेळेवर आणि सुरक्षितपणे आपल्या घरी पोहोचता येणार आहे. अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी प्रवाशांनी आगाऊ आरक्षण करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. ----- आरटीओची १४ दिवसांची धडक मोहीम दिवाळीच्या हंगामात अनेकदा खासगी ट्रॅव्हल्स आणि बस चालकांकडून अवाजवी भाडेवाढ करून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक केली जाते. या मनमानी कारभाराला कायमचा ब्रेक लावण्यासाठी बीड आरटीओ प्रशासनाने अत्यंत आक्रमक आणि सकारात्मक पाऊल उचलले आहे. प्रशासनाने सलग १४ दिवसांची विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. ही कारवाई केवळ कागदोपत्री मर्यादित न राहता, थेट रस्त्यावर गाड्या अडवून आणि उभ्या करून त्यांची कसून तपासणी केली जात आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणारे आणि जादा भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. ------ जादा बसेसचे स्वतंत्र वेळापत्रक बीड आगार: बीड ते धुळे: जाता ०७:३०, येता १४:३० बीड ते स्वारगेट (पुणे): जाता ०६:१५, येता १४:१५ बीड ते कल्याण: जाता २०:००, येता २०:०० बीड ते बारामती: जाता ०८:३०, येता १४:०० बीड ते त्र्यंबकेश्वर: जाता ११:३०, येता ०६:०० -------------- धारूर आगार: धारूर ते पुणे: सकाळी ०९:०० धारूर ते आदमापूर: सकाळी ०७:०० धारूर ते मेहकर: जाता ०७:१५, येता १४:०० ----- माजलगाव आगार: माजलगाव ते पुणे: सकाळी ०७:०० आणि रात्री २०:०० माजलगाव ते सोलापूर: जाता ०८:३०, येता १४:०० ------ गेवराई आगार: गेवराई ते पुणे: रात्री १९:१५ गेवराई ते अमरावती: सकाळी ०७:०० गेवराई ते सोलापूर: जाता ०९:३०, येता १५:३० ------- पाटोदा आगार: पाटोदा ते पुणे: सकाळी ०७:३० आणि ०८:०० आष्टी आगार: आष्टी ते जळगाव: जाता ११:३०, येता ०६:०० आष्टी ते मुंबई: सायंकाळी १९:०० ----- अंबाजोगाई आगार: अंबाजोगाई ते रिसोड आणि पुणे: रात्री २१:३० ------------- कोट दिवाळीत चाकरमान्यांची कोणतीही आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून प्रशासनाने १४ दिवसांची विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. आमचे पथक प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून गाड्या थांबवून तपासणी करत आहे. विनापरवाना चालणाऱ्या गाड्या, अवाजवी भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्स आणि सुरक्षिततेचे नियम डावलणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जात असून, प्रवाशांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. - सुरेश आव्हाड, आरटीओ, बीड ------- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन एसटी विभागातर्फे लांब पल्ल्याच्या व प्रादेशिक मार्गांवर विशेष जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून जाता-येता अचूक वेळापत्रक जाहीर केले आहे. खासगी वाहनांची अवाजवी भाडेवाढ टाळून प्रवाशांनी आपल्या हक्काच्या, सुरक्षित आणि सवलतयुक्त लालपरीने प्रवास करावा. सुविधेसाठी आगाऊ आरक्षण करावे. - निलेश पवार, आगार प्रमुख, बीड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej (Bunty) Patil on Hasan Mushrif Gokul : 'त्यांना गोकुळ दूध संघच बंद पाडायचाय!' हसन मुश्रीफांच्या टीकेनंतर बंटी पाटलांचा थेट आरोप, 'सहकारातील काळा दिवस' म्हणत मांडली रोखठोक भूमिका!

iPhone Duo Screen Issue: Apple iPhone Duoच्या स्क्रीनला तडे! कंपनीकडून रिप्लेसमेंट मिळणार का? नेमकं प्रकरण काय जाणून घ्या

Latest Marathi News Update: निकृष्ट काम केल्याने ठेकेदाराला नोटीस

Gokul Chairman Election : 'नविद मुश्रीफ यांच्या नावाचं पाकीट दिलं, तेव्हा मी जातीवादी नव्हतो का?'; सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना सवाल, थेट पुराव्यासह उघड केली जुनी बात

Pradeep Purnekar Case: ''तुम्ही पळून गेलात, तुमच्यात हिंमत नाही..'', पूर्णेकर हत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचा संताप, पोलिस तपासावरही आक्षेप

SCROLL FOR NEXT