छत्रपती संभाजीनगर

लातूरकर रमले दिपोत्सवाबरोरच स्वरोत्सवात गुलाबी थंडी अनुभवत श्रोत्यांनी अनुभवला ‘दिवाळी पहाटे’चा आनंद;

CD
LTR26B15590, LTR26B15591 लातूर : अष्टविनायक मंदिर येथे दिवाळी पहाट मैफलीत रविवारी गायन सादर करताना सायली टाक, शर्वरी डोंगरे, उन्नती मुंढे आदी. (दुसऱ्या छायाचित्रात) भल्या पहाटे स्वरांचा आनंद घेताना संगीतप्रेमी. -- लातूरकर रमले स्वरोत्सवात --------------- गुलाबी थंडीत श्रोत्यांनी अनुभवला ‘दिवाळी पहाट’चा आनंद --- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. ८ : लक्ष्मीपूजनादिवशी भल्या पहाटे अष्टविनायक मंदिर गाठून तेथे दीपोत्सवाबरोरच स्वरोत्सवाचा आनंद घेणे, हे असंख्य लातूरकरांसाठी दिवाळीत अविस्मरणीय क्षण असतो. त्याप्रमाणे यंदाही असंख्य लातूरकरांनी भल्या पहाटे गुलाबी थंडी अनुभवत, वाफाळत्या दुधाचा आस्वाद घेत आणि दिव्यांच्या रोषणाईमध्ये रसिकांनी स्वरोत्सवाचा आनंद घेतला. लक्ष्मीपूजनादिवशी पहाटे अनेकांची पावले मंदिराकडे वळतात. त्यामुळेच या दिवसाचे औचित्य साधून अष्टविनायक मंदिर येथे लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड आणि अष्टविनायक प्रतिष्ठान यांच्या वतीने रविवारी ‘दिवाळी पहाट’ आयोजित करण्यात आली होती. मैफलीआधी पहाटे साडेचार वाजता सुमारे दहा हजार पणत्या मंदिर परिसरात प्रज्वलित करण्यात आल्या. त्यामुळे स्वरोत्सवाबरोबरच श्रोत्यांना दीपोत्सवही अनुभवता आला. यावेळी लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेडचे संस्थापक प्रदिप राठी, अध्यक्ष आकाश राठी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यंदा सायली टाक, शर्वरी डोंगरे, उन्नती मुंढे या गायिकांनी दिवाळी पहाट आपल्या स्वरांनी रंगवली. मैफलीच्या सुरवातीला अहिर भैरव रागातील प्रा. शशिकांत देशमुख यांनी तयार केलेली ‘कृष्ण कृष्ण हरी राधे श्याम’ ही रचना त्यांनी सादर केली. त्यानंतर ‘अलबेला सजन आयो’ हे द्रुत तीन तालातील बंदीश गायली. त्यानंतर एकदंताय वक्रतुण्डाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, राम राम जय राजाराम, वनमाली वासुदेव, गजानना गजानना, देवा श्री गणेशा, जय जय महाकाली, मेरे घर राम आये है, अच्युतम केशवम... अशा विविध रचना त्यांनी वैशिष्ट्यपूर्णरीत्या सादर केल्या. त्यांना व्हायोलिन वादक पंकज शिरभाते (पुणे), बासरीवादक चिरंजीव जयेश कुलकर्णी (सोलापूर) यांनी साथ केली. पहाटेपासून साडेचार ते सकाळी नऊपर्यंत चाललेल्या या मैफलीला संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला. ---

Praful Patel Clarification : '10 नोव्हेंबरनंतर पुन्हा भेटणार...' शरद पवार-प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीत काय ठरलं? राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे होणार का विलीनीकरण?

Political Statement by MP Omraje Nimbalkar : "दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर..."; ठाकरेंना सोडचिठ्ठी देणाऱ्या बड्या खासदाराच्या वक्तव्याने खळबळ!

U19 IND vs U19 PAK: रोमहर्षक सामन्यात भारताचा पराभव! हमजा जहूरच्या पाकिस्तानचा विजय, आता Asia Cup सेमीफायनलसाठी समीकरण काय?

Latest Marathi News Live Update: : धाराशिवच्या कौडगाव एमआयडीसीमधील सोलर प्लांटला भीषण आग; लाखो रुपयांच्या सोलर प्लेट्स जळून खाक, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

MPSC Success Story: सहा वेळा अपयश, तरी जिद्द सोडली नाही! नांदेडचा ओमकेश झाला क्लास वन अधिकारी; आईच्या मांडीवर डोकं ठेवताच अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT