छत्रपती संभाजीनगर

दिवाळीच्या साजशृंगारात साड्यांची मोहिनी

CD
दिवाळीच्या साजशृंगारात साड्यांची मोहिनी ------------- पैठणीपासून डिझायनरपर्यंत पसंती; आरी वर्क ब्लाऊज ट्रेंडमध्ये ----------- सकाळ वृत्तसेवा हिंगोली, ता. ३ : दिवाळी सण दोन दिवसांवर आल्याने सर्वत्र तयारी सुरू आहे. बाजारपेठेत दिवाळीत लागणाऱ्या विविध वस्तूं उपलब्ध झाल्या असून, या वस्तूंची खरेदी वाढली आहे. विशेषत: सणासुदीला नवा पेहराव करण्यासाठी महिलांची पारंपरिक पैठणीपासून डिझायनर साड्यांपर्यंत विविध पर्यायांना पसंती मिळत आहे. दिवाळी सणानिमित्त हिंगोलीसह वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगावसह ग्रामीण भागातील बाजारपेठा सजल्या आहेत. या सणात कपड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. त्या अनुषंगाने कापड व्यापाऱ्यांनी स्टाॅक मागवून ठेवला आहे. साध्या साडीवर हेवी वर्कचा डिझायनर ब्लाऊज घालण्याचा ट्रेंड तरुणींमध्ये लोकप्रिय होत असून, आरी वर्कच्या ब्लाऊजसाठी महिनाभरापासून बुकिंग सुरू झाले आहे. साड्यांचे विविध प्रकार बाजारपेठेत उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या बजेटनुसार ५०० रुपयांपासून ते २० हजार रुपयांपर्यंत साड्यांचे पर्याय उपलब्ध आहेत. यंदा टिश्यू, बांबू सिल्क, कॉटन सिल्क, चंदेरी सिल्क आणि रंगोली सिल्क या फॅब्रिक्सच्या साड्यांनाही महिलांकडून पसंती मिळत आहे. दिवाळीपूर्वी साड्यांच्या खरेदीला सुरवात झाली असून, आवडीच्या साड्यांची निवड करण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौक, जवाहर रोड, महावीरस्तंभ भागातील कपडा विक्रीच्या दुकानात गर्दी पहायला मिळत आहे. ----------- साडी साधी, ब्लाऊज मात्र डिझायनर साडीच्या निवडीसोबतच तिच्यावर शोभून दिसणाऱ्या डिझायनर ब्लाऊजकडेही तरुणींचे विशेष लक्ष आहे. साध्या साडीला आकर्षक लूक देण्यासाठी हेवी वर्कचे ब्लाऊज शिवण्याचा ट्रेंड वाढत आहे. आरी वर्क, हेवी वर्क आणि वेगवेगळ्या डिझाइनमधील ब्लाऊजना मोठी मागणी आहे. यासाठी महिलांकडून महिन्यापूर्वीपासूनच ऑर्डर दिल्या जात आहेत. काही डिझायनर्सकडे ऑर्डर्सची संख्या वाढल्याने नवीन ऑर्डर घेणे शक्य होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीत साड्यांसोबतच डिझायनर ब्लाऊजचीही चर्चा रंगत आहे. ------------ रेडिमेड कपड्यांना पसंती तरूण वर्गाची रेडिमेड कपड्यांना विशेष पसंती आहे. वाढती मागणी लक्षात घेता विक्रेत्यांनी विविध फॅशनेबल जिन्स, टी- शर्ट, शर्ट विक्रीसाठी आणले आहेत. सुरत, अमरावती, मुंबई आदी ठिकाणाहून रेडिमेड कपड्यांचा स्टाॅक मागविण्यात आला आहे. ----------------- ((कोट)) दिवाळीपूर्वी महिनाभरापासून महिलांची साड्यांची खरेदी करण्याची लगबग सुरू झाली. यंदा टिश्यू सिल्क, बांबू सिल्क, कॉटन सिल्क, चंदेरी सिल्क आणि रंगोली सिल्क या फॅब्रिकच्या साड्यांना पसंती मिळत आहे. माझ्याकडे राजकमल पैठणीला विशेष मागणी असून, तरुणींकडून डिझायनर साड्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. - प्रणव दोडल, व्यावसायिक ------------------ ((कोट)) प्लेन साडी आणि त्यावर डिझायनर ब्लाऊज अशी सध्या तरुणींमध्ये क्रेझ आहे. आरी वर्क करून ब्लाऊज डिझाइन करण्यासाठी महिलांकडून अधिक मागणी येत आहे. दीड महिन्यापूर्वीपासूनच ऑर्डर्स येण्यास सुरवात झाली. आता ऑर्डर्स इतक्या वाढल्या आहेत की नवीन काम घेणे शक्य होत नाही. आरी वर्कचे हेवी ब्लाऊज आणि त्यासोबत साध्या प्लेन साड्यांना प्रचंड मागणी आहे. -महंमद चाँद, डिझायनर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Fort: शिवप्रेमी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! रायगडाची सफर आता चार मिनिटांत, दीड महिन्यानंतर रोपवे पुन्हा सुरू

Satara Bank Election: ४४-४४ मतांचा पेच अन् ईश्वर चिठ्ठीचा कौल; सातारा जिल्हा बँकेत सुनील माने विजयी, कोरेगावात राष्ट्रवादीची मते फुटली?

Crime News: भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, जागेवरच मृत्यू; शिंदेसेनेच्या नेत्यानं कट रचल्याचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

शुक्राची वक्री चाल ५ राशींचं टेन्शन वाढवणार, पुढील १२ दिवस अनावश्यक खर्च टाळा, अन्यथा...

Satana Bribery Case: वडिलांच्या मालमत्तेवर वारस नोंद करण्यासाठीही लाच! सटाण्यातील सरकारी अधिकारी एसीबीच्या ताब्यात, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT