छत्रपती संभाजीनगर

दिवाळीच्या रोषणाईत वीजसुरक्षेकडे लक्ष आवश्‍यक

CD
दिवाळीच्या रोषणाईत वीजसुरक्षेकडे लक्ष आवश्‍यक ------- खबरदारी घेण्याचे महावितरणचे आवाहन; निष्काळजीपणामुळे आग लागण्याचा धोका ---------- हिंगोली, ता. ५ : दिवाळीच्या कालावधीत सजावट आणि आतषबाजी करताना वीजसुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यास शॉर्टसर्किट, विजेचा धक्का किंवा आग लागण्यासारखे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे सार्वजनिक वीजयंत्रणेसह घरगुती विद्युत उपकरणांपासूनही नागरिकांनी सतर्क राहावे. कोणताही धोका न पत्करता सुरक्षितपणे दिवाळी साजरी करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. दिवाळीनिमित्त घरोघरी विद्युत रोषणाई, आकर्षक विद्युत माळा आणि आकाशकंदिलांची सजावट करण्याची लगबग सुरू झाली आहे. तसेच फटाक्यांच्या आतषबाजीमुळेही सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक नागरिक घर, इमारती, गॅलरी आणि परिसरात विद्युत दिव्यांच्या माळा लावून रोषणाई करतात. ही सजावट करताना वापरण्यात येणाऱ्या विद्युत माळांचा दर्जा तपासणे आवश्यक आहे. गॅलरीतील लोखंडी जाळी, घरातील लोखंडी जिना किंवा इतर धातूंच्या वस्तूंपासून विद्युत माळा आणि आकाशकंदिलाच्या वायर सुरक्षित अंतरावर ठेवाव्यात. सजावटीसाठी वापरण्यात येणारी वायर अखंडित आणि सुस्थितीत असल्याची खात्री करावी. तसेच विद्युत माळा लावताना ओलसर हातांनी प्लग किंवा स्वीचला स्पर्श करू नये. सजावटीच्या उत्साहात विद्युत सुरक्षेचे नियम विसरू नयेत. योग्य दर्जाच्या विद्युत साहित्याचा वापर, सुरक्षित जोडणी आणि आवश्यक खबरदारी घेतल्यास संभाव्य अपघात टाळता येऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या तसेच कुटुंबीयांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन दिवाळी साजरी करावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. -- कुठे संपर्क कराल? फटाक्यांच्या आतषबाजीत सार्वजनिक वीजयंत्रणेला आगीचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. वीजयंत्रणेला आग लागल्यास, धोका निर्माण झाल्यास, वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या २४ तास सुरू असणाऱ्या कॉल सेंटरच्या १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ किंवा १९१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. --------- काय काळजी घ्यावी? -घरातील किंवा इमारतीतील अर्थिंग योग्य असल्याची खात्री करावी. -आकाशकंदील लावताना विद्युत तारांची विशेष काळजी घ्यावी. -तुटलेल्या किंवा खराब झालेल्या वायरचा वापर करू नये. -वायरमध्ये बिघाड असल्यास दुरुस्ती करून घ्यावी. -तुटलेल्या किंवा चिकटपट्टी जोडलेल्या वायरचा वापर टाळावा. -विद्युत माळा आणि घरगुती उपकरणांच्या जवळ तेलाचे दिवे किंवा मेणबत्त्या लावू नयेत. -अनेकदा आकाशकंदील किंवा विद्युत माळा लावण्यासाठी थ्री-पिन प्लगचा वापर न करता वायर थेट प्लगच्या छिद्रात आगपेटीच्या काड्यांच्या साहाय्याने खोचली जाते. अशा पद्धतीमुळे प्लगमध्ये स्पार्किंग होऊन आग लागण्याची शक्यता असते. -विद्युत जोडणीसाठी योग्य प्लग आणि सॉकेटचाच वापर करावा. -एकाच सॉकेटवर अनेक उपकरणे जोडून अतिरिक्त भार टाकू नये. ---------------- ((कोट)) दिवाळी सणात आकाशकंदील, लायटींग लावताना शाॅर्टसर्किट होणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे असते. शिवाय फटाके उडवताना धोका निर्माण होवू शकतो. त्याकरीता नागरिकांनी काळजी घ्यावी. कुठेही शाॅटसर्किटचा धोका निर्माण होत असेल तर महावितरणला माहिती द्यावी. तातडीने दुरूस्ती करण्यात येईल. - प्रवीण दरोली, प्र. अधीक्षक अभियंता, महावितरण, हिंगोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Digital Payments: ऐन दिवाळीत Google Pay डाऊन? ऑनलाइन पेमेंट करताना अनेकांना करावा लागतोय अडचणींचा सामना

Maharashtra Drought Relief : ७३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजारांची मदत - फडणवीसांची माहिती; उर्वरितांना दोन दिवसांत रक्कम मिळणार

Satara Farmer Loan Waiver: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३४ हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ, चौथी यादी जाहीर

Navi Mumbai: माजी मंत्र्याचा अनधिकृत कारभार? मोरबे धरण क्षेत्रात अलिशान फार्म हाऊसची उभारणी, नवा वाद पेटण्याची शक्यता

Latest Marathi News Live Update : घाबरायचे नसते, त्यांच्यात घुसून कार्यक्रम करायचा असतो - गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना टोला

SCROLL FOR NEXT