छत्रपती संभाजीनगर

दुष्काळग्रस्त, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीत किराणा किट

CD
दिवाळीसाठी शेतकऱ्यांना देणार किराणा किटची भेट ------------ छत्रपती संभाजीनगर, ता. २५ ः दुष्काळ आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी अखिल भारतीय बळिराजा संघटनेच्या वतीने किराणा साहित्याच्या किटचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी निधी संकलन करून गरजू शेतकरी कुटुंबांपर्यंत मदत पोचविण्याचा निर्णय संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला. या संदर्भात एका खासगी क्लासेसमध्ये रविवारी (ता. २५) संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. संस्थापक अध्यक्ष निवृत्ती डक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त मदत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याचे ठरविले. बैठकीला मराठवाडा अध्यक्ष राजेंद्र तांबे पाटील, जिल्हाध्यक्ष सुखदेव कदम पाटील, शहर जिल्हाध्यक्ष उद्धव सावरे पाटील, शहर सचिव दीपक वैष्णव, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन बापट, महिला शहर अध्यक्ष मीरा गाडेकर, महिला कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शिल्पा भोसले आणि सचिव माधुरी साळुंके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रे देऊन सत्कार करण्यात आला. पुणे जिल्हाध्यक्षपदी किरण तायडे पाटील, पुणे शहर महिला अध्यक्षपदी जयश्री किरण तायडे पाटील, तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा युवक अध्यक्षपदी सागर मस्के पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. राजेंद्र तांबे पाटील यांनी सूत्रसंचालन केले. निवृत्ती पाटील यांनी मार्गदर्शन केले. सुखदेव कदम पाटील यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil: कर्जतमधील वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी संबंध नाही; दिलीप वळसे पाटलांचे स्पष्टीकरण

Solapur Crime: मेहुणीला शिक्षणासाठी घरी आणलं, पत्नी असताना तिच्यासोबत लग्न केलं अन्...; सासऱ्याने घडवला रक्तरंजित थरार

VIDEO : मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त वक्तव्य; PM मोदींबद्दल बोलताच कार्यक्रमात गोंधळ, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण, नेमकं काय घडलं?

Madhuri Dixit Kon Honaar Karodpati : "बाई, तुम्ही खूप कडक बोलताय..."; शिक्षिकेसमोर थेट विद्यार्थी बनली माधुरी दीक्षित! 'कोण होणार करोडपती'मधील सुंदर क्षणाचा व्हिडिओ व्हायरल!

Latest Marathi News Update : चौकशीपूर्वीच रुग्णालयातून धूम ठोकून राणा सूर्यवंशी पसार! बारामती हल्ला प्रकरणात खळबळ, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT