छत्रपती संभाजीनगर

रस्त्यावर फटाके उडविल्यास होणार कारवाई

CD
रस्त्यावर फटाके उडवू नका, अन्यथा होईल कारवाई ------------------- हिंगोली, ता. ६ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तात्पुरत्या फटाके विक्रीसह फटाके उडविण्याबाबत नियमावली जारी केली आहे. सार्वजनिक रस्ते, पदपथ अथवा रस्त्यापासून १० मीटरच्या आत फटाके उडविण्यास मनाई असून, उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा जिल्हा पोलिस प्रशासनाने दिला आहे. स्टॉलधारकांना परवान्याची मुदत संपल्यानंतर फटाक्यांची विक्री करता येणार नाही. शिल्लक साठा अधिकृत गोदामात किंवा घाऊक परवानाधारकाकडे परत जमा करणे बंधनकारक राहील. तात्पुरत्या फटाके स्टॉलच्या ५० मीटर परिसरात आतषबाजी करण्यास बंदी आहे. याशिवाय, विदेशी बनावटीचे फटाके विक्री करण्यासही मनाई केली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि पर्यावरण संरक्षण नियमांनुसार, १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी आहे. शंभरपेक्षा अधिक फटाके असलेल्या साखळी बॉम्बवर बंदी घातली आहे. विशिष्ट आकाराच्या ॲटमबाँबवरही कायदेशीर निर्बंध लागू राहतील. ------------ रात्री १० नंतर आवाजाचे फटाके उडविण्यास बंदी ध्वनिप्रदूषण नियंत्रण नियमांनुसार, रात्री १० ते सकाळी सहा या वेळेत आवाज करणाऱ्या फटाक्यांवर बंदी असेल. केवळ बिनआवाजी फटाके आणि पर्यावरणपूरक ग्रीन फटाके उडविण्यास मुभा राहील. रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या १०० मीटर परिसरात फटाके उडविण्यास मनाई आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे नोंदविले जातील. नियमांचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांनी तत्काळ डायल ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुणं हादरलं! पाय तोडून कचऱ्यात टाकले; सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

दोन महिन्यांनी शुक्र पुन्हा कन्या राशीत; पुढील १६ दिवस 'या' ५ राशींची चांदीच चांदी, २२ नोव्हेंबरपर्यंत अचानक धनलाभ

IPL 2027 Trade: लखनौ सुपर जायंट्स-राजस्थान रॉयल्स यांच्यात मोठी डिल... ३-४ खेळाडू जाणार इथून तिथे; कोण असतील ते?

Vastu Tips: लाकूड, मेटल की दगड? वास्तुनुसार कोणती नेमप्लेट सर्वात शुभ? घराच्या नेमप्लेटमध्ये दडलंय प्रगतीचं रहस्य!

Gangapur News: एकीकडे दुष्काळ, दुसरीकडे विहिरीत पाण्याचा अखंड झरा! गंगापूर तालुक्यातील मालुंजा खुर्दमध्ये कुतूहल, पाहण्यासाठी गर्दी

SCROLL FOR NEXT