छत्रपती संभाजीनगर

दिवाळीच्या स्वागतासाठी लेडीज क्लब ग्राउंडवर लगबग फटाका स्टॉल उभारणीच्या कामाला वेग

CD
फटाका स्टॉल उभारणीच्या कामाला वेग ---- लेडीज क्लब ग्राउंडवर रविवारपासून सुरू होणार विक्री --- सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. २८ : दिवाळीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, शहरवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सणाच्या तयारीचा एक भाग म्हणून शहरातील लेडीज क्लबच्या ग्राउंडवर फटाका विक्रेत्यांची जोरदार लगबग सुरू झाली आहे. मैदानात व्यावसायिकांकडून आपले फटाक्यांचे स्टॉल उभारण्याच्या कामाला वेग आला असून, लोखंडी सांगाडे आणि पत्र्यांच्या साह्याने दुकाने थाटली जात आहेत. आगामी दोन-तीन दिवसांत हे सर्व स्टॉल विविध प्रकारच्या आकर्षक आणि रंगीबेरंगी फटाक्यांनी पूर्णपणे सज्ज होणार असून, त्यानंतर शहरात अधिकृतपणे फटाक्यांच्या विक्रीला सुरवात होईल. लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीच्या असलेल्या आतषबाजीच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिक लवकरच या मैदानाकडे वळणार आहेत. लेडीज क्लबच्या ग्राउंडवर साधारण ४० ते ४५ फटाका विक्रेत्यांचे तात्पुरते म्हणजेच दिवाळीपुरते स्टाॅल दरवर्षी उभारले जातात. एकाच ठिकाणी होलसेल दरात फटाके खरेदी करता येत असल्याने नागरिकही या ठिकाणी गर्दी करतात. दहा ते १५ दिवसांच्या कालावधीत लाखो रुपयांची उलाढाल या फटाके विक्रीतून होते. काही हंगामी विक्रेते केवळ दिवाळीतच फटाके विक्री करतात. ----- ((चौकट)) परवानगीसाठी ३३५ विक्रेत्यांचे अर्ज दरम्यान, तात्पुरत्या स्वरूपात फटाका स्टाॅल टाकून विक्रीकरिता परवानगी मिळण्यासाठी जिल्ह्यातून एकूण ३३५ विक्रेत्यांचे अर्ज जिल्हा प्रशासनाकडे आलेले आहेत. त्यातील ६० अर्जांना प्रशासनाकडून फटाके विक्री करण्याची परवानगी देण्यात आली असून, उर्वरित अर्जांवर परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. --- धाराशिव ः येथील लेडीज क्लबच्या मैदानात फटाके स्टाॅलसाठी शेड उभारणीचे सुरू असलेले काम. ....... फोटो क्रमांक ःOSM26B07292

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Auction: सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील 'किरण' DCच्या ताफ्यात; मुंबई इंडियन्सकडून जोरदार प्रयत्न, पण.. कोण आहे Kiran Navgire?

Israel Election: इस्रायलच्या निवडणूक निकालात मोठा ट्विस्ट; 'बीबी' येणार की जाणार?

Marathi News Live Updates : नागपुरात 'अर्णब' चक्रीवादळाचा प्रभाव; ढगाळ वातावरणामुळे पावसाची हजेरी आणि हवेत गारवा!

Palghar News : पालघरमध्ये प्रकल्पविरोधी संघर्ष पेटणार! ५२ संघटनांचा प्रशासकीय बैठकीवर बहिष्कार, ३० ऑक्टोबरला जनआक्रोश सभा

Satana News : वृक्षतोड रोखा, अन्यथा जनआंदोलन; बागलाणमध्ये राष्ट्रवादीसह पर्यावरणप्रेमींचा एल्गार! माजी आमदार संजय चव्हाण यांचा इशारा

SCROLL FOR NEXT