दिवाळी सणानिमित्त खाद्यपदार्थांची
तपासणी मोहीम राबविण्याची मागणी
-----
चाकूर, ता. २१ (बातमीदार) ः दिवाळीच्या सणात मिठाई, सुका मेवा, फराळ आणि पॅकबंद खाद्यपदार्थांची तपासणी केली जावी, तसेच विक्रीत ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी लातूर जिल्ह्यात विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तथा लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे मराठवाडा समन्वयक संग्राम वाघमारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
दिवाळीत खाद्यपदार्थांचे वजन, दर्जा, उत्पादन व वापराची मुदत आणि छापील किमतीबाबत ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता असून मुदतबाह्य वस्तूंची विक्री तसेच एमआरपीपेक्षा अधिक दर आकारण्याचे प्रकार वाढू शकतात. ते रोखण्यासाठी वैध मापनशास्त्र विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त तपासणी मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, पॅकबंद वस्तूंवरील उत्पादकाचे नाव, निव्वळ वजन, उत्पादनाचा महिना व वर्ष, कमाल, किरकोळ किंमत आणि ग्राहक तक्रार निवारणाची माहिती तपासावी. तसेच खाद्यपदार्थांचा दर्जा, स्वच्छता, साठवणूक व अन्नसुरक्षेच्या नियमांची पडताळणी करून ग्राहकांसाठी तक्रार नोंदविण्याचे दूरध्वनी क्रमांक आणि ई-मेल प्रसिद्ध करावेत, तपासणीतील अनियमितता आणि त्यावरील कारवाईचा आढावा घेऊनच दिवाळीपूर्वीच प्रभावी उपाययोजना करून ग्राहकांना सुरक्षित, दर्जेदार खाद्यपदार्थ योग्य किमतीत उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेने केली आहे. या निवेदनावर संग्राम वाघमारे, किशन धुळशेट्टे, अविनाश सवई, विशाल कणसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.