छत्रपती संभाजीनगर

घर बंद करून जाणाऱ्यांनी सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात

CD
दिवाळीत बाहेरगावी जाताय? घराच्या सुरक्षेकडे लक्ष द्या! उमरगा, ता. ३ (बातमीदार) : दिवाळी सण आणि सुट्ट्यांच्या काळात अनेक नागरिक घर बंद करून गावी किंवा बाहेरगावी जातात. अशा वेळी घरफोडी अथवा चोरीच्या घटना घडू नयेत, यासाठी नागरिकांनी घराच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन उमरगा पोलिसांनी केले आहे. पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी नागरिकांसाठी सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. बाहेरगावी जाताना घराला मजबूत कुलूप लावावे. सर्व दरवाजे आणि खिडक्या व्यवस्थित बंद असल्याची खात्री करावी. घरातील अनावश्यक दिवे बंद ठेवावेत. गरज असल्यास सुरक्षेच्या दृष्टीने एक दिवा सुरू ठेवावा. घरातील रोकड, सोन्याचे दागिने आणि अन्य मौल्यवान वस्तू शक्यतो घरात ठेवू नयेत. त्या बँकेच्या लॉकरमध्ये किंवा विश्वासू व्यक्तीकडे सुरक्षित ठेवाव्यात. शक्य असल्यास घराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करावी. घर बंद करून बाहेरगावी जात असल्याची माहिती शेजाऱ्यांना द्यावी आणि घरावर लक्ष ठेवण्याची विनंती करावी. परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. ‘आपली सुरक्षा... आमची जबाबदारी’ या ब्रीदवाक्यानुसार उमरगा पोलिस प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज आहे. ....................... ((कोट)) दिवाळीचा आनंद घेताना घराच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नये. नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे. - प्रल्हाद सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara District Bank: जयकुमार गोरेंचा करिष्मा! ७५ पैकी ५३ मते घेत सातारा जिल्हा बँकेत दणदणीत विजय; अर्जुन काळेंचा दमदार प्रवेश, शेखर गोरेंना केवळ ७ मते

मोहम्मद आमीर, तू IPL 2027 मध्ये काव्या मारनच्या संघाकडून खेळणार का? पाकिस्तानी गोलंदाजाने सांगितला auction पूर्वीचा प्लान

कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा! दिवाळीत पाणीकपात रद्द, MIDCचा निर्णय

Dharashiv News: भूम शहरातील नागरिकांसाठी गुड न्यूज! अनेक भागांतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण होणार; विकासकामांचे भूमिपूजन

Raigad Fort: शिवप्रेमी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! रायगडाची सफर आता चार मिनिटांत, दीड महिन्यानंतर रोपवे पुन्हा सुरू

SCROLL FOR NEXT